समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांची उंचखडक येथील श्रीराम मंदिरास १,०,१००० हजाराची देणगी

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक (श्री क्षेत्र राममाळ) येथील प्रभू श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू असून मंदिराच्या बांधकामासाठी प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी एक लाख एक हजाराची देणगी दिली आहे
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर) यांनी आपले चिरंजीव युवा कीर्तनकार ह.भ.प.कृष्णा निवृत्ती महाराज देशमुख यांच्या नावाने *१०१००० रुपये देणगी चा धनादेश दिला त्यांचे सहकारी ह.भ.प. किरण महाराज शेटे यांनी देवस्थानाचे उपाध्यक्ष व अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.अशोकराव देशमुख , देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प.विठ्ठलपंत गोंडेमहाराज, ह.भ.प.दीपक महाराज देशमुख ,उंचखडक बुद्रुक ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री.महिपाल देशमुख, श्री.दत्ता अस्वले, श्री.सचिन देशमुख , यांच्याकडे सुपूर्त केला

श्रीराम मंदिराचे कळसाचे बांधकाम चालू आहे बांधकाम पूर्णत्वाकडे जात आहे उंचखडक बु येथील देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी मंदिराचे या पवित्र धार्मिक कार्यासाठी तालुक्यातील श्रीरामभक्त,राजकीय, सामाजिक भाविक भक्तांना देणगीरूपी मदतीसाठी आवाहन केले आहे ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर) यांचे देवस्थान ट्रस्ट व गावकऱ्यांनी आभार मानले आहे