इतर

शेवगावच्या विकासासाठी विधानसभेत हक्काच्या माणसाची गरज – नरेंद्र घुले पाटील

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी


मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून शेवगावची ओळख तर होतीच मात्र उत्पन्नातही अग्रेसर असणाऱ्या शेवगाव शहरासह तालुक्यात मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने जनता हैराण आहे. रस्ते पाणी वीज प्रश्नी व शासकीय कार्यालयात सामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी आपल्याला विधानसभेत हक्काचा माणूस दिल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. असे मत लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी व्यक्त केले.


शेवगाव तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार व दीपावली फराळ कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना नरेंद्र घुले पाटील बोलत होते. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिंकलेल्या ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी विचारमंचावर माजी आमदार चंद्रशेखर घुले, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, अरुण पाटील लांडे, काकासाहेब नरवडे,दिलीपराव लांडे, जिल्हा राष्ट्रवादीचे संजय कोळगे उपस्थित होते.तालुक्यात सामान्य लोकांना भेडसावत असणाऱ्या मूलभूत प्रश्नांची उकल आता होणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्व सामान्य माणसापर्यंत सर्व योजना पोहोचवण्याचे काम करून लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांना अभिप्रेत अशा आदर्श शेवगाव तालुका निर्माण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. याचं आपण चीज करा असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला.


यावेळी रामनाथ राजपुरे, संजय फडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन एकनाथ कसाळ, गणेश खंबरे, शिवाजी भुसारी, अॅड.अनिलराव मडके, ताहेर पटेल, भागवत लव्हाट, मोहनबापू देशमुख, प्रदीप काळे,कृष्णा ढोरकुले,गणेश देशमुख,रोहन साबळे, अॅड. लक्ष्मणराव लांडे, राजेंद्र आढाव, अशोक मेरड, बाबुलाल पटेल, विठ्ठलराव फटांगरे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेवगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास नेमाने यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केले.

    गावाला एकत्र ठेवून विकास करता येईल. याकडे आपण नूतन पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. याच दृष्टीने आपण काम केले तर आपणाला गावच्या विकासासह तालुक्यातील विकास कामे करता येऊ शकतात. शेवगाव तालुक्याच्या विकास कामासाठी आपण स्वतः सत्ता जरी नसली तरी वेळप्रसंगी आपण संघर्ष करू मात्र विकासा कामासाठी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.

डॉ.क्षितिज घुले पाटील
सभापती पंचायत समिती शेवगाव

घुले पाटलांच्या कार्यकाळात तालुक्यात अनेक विकास कामे झाली. मात्र आता अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस होत नाही. आपण उज्वल भविष्यासाठी व तालुक्याचं गेलेलं वैभव परत आणण्यासाठी मोठ्या ताकतीने काम केले पाहिजे. भविष्यकाळ हा तुमचा आमचा आहे. गाव पातळीवर आपण ज्याप्रमाणे काम करून विजय मिळवला. त्याच कसोटीवर काम करून आपल्याला घुले पाटलांना आपल्याला विधानसभेत पाठवण्याचा आज चंग आपण बांधला पाहिजे अशी विनंती तरुण सहकार्यांना या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने करतो.

संजय कोळगे
जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button