अरणगाव(मेहराबाद)ला द्वादशीला रथयात्रा संपन्न

नगर- सालाबादप्रमाणे संतांची पावन भूमी असलेल्या श्री क्षेत्र अरणगाव येथे श्री संत बुवाजीबुवा महाराज,अवतार मेहेरबाबा व गुलाब शहा बाबा यांच्या संजीवन समाधी असलेल्या पुण्य भूमीत अखंड हरीनाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्याची सांगता काल दुपारी रथ मिरवणूक काढुन करण्यात आली.या कार्यक्रमाचा प्रारंभ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, भगवानराव फुलसौंदर(मा महापौर), शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, स्वाती मोहन गहिले,सरपंच अरणगांव, अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त मेहेरनाथ कलचुरी,रमेश जंगले यांच्या हस्ते करून झाली.यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश जाधव,उपाध्यक्ष गणेश जाधव,व्यवस्थापक व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंदराव शेळके,दत्तात्रय जाधव,सुधाकर जाधव,ज्ञानदेव शेळके,रामदास शिंदे,मोहन नाट,ज्ञानेश्वर देशमुख आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
पहाटे एकादशी महापुजा,अभिषेक आ.निलेशजी लंके,संदेश कार्ले (जि.प.सदस्य),विठ्ठल दळवी यांच्या हस्ते झाली तर द्वादशीला महापुजा स्वातीे कार्ले,आसाराम चांगु दळवी यांचे हस्ते संपन्न झाली.नंतर लक्ष्मण महाराज कदम शास्त्री(आळंदी) यांचे काल्याचे किर्तन झाले व नंतर महाप्रसाद रात्री उशिरापर्यंत झाला.महाप्रसाद आसाराम चांगु दळवी,संजय महाराज भाटी,शिरूर(भाजी साहित्य)या कुटूंबीयांकडून संपन्न झाला.
आषाडी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी द्वादशीला साक्षात पांडुरंग उपवास सोडायला अरणगाव(मेहराबाद)येथील श्री संत बुवाजी बुवा महाराज मंदिरात येतात अशी आख्यायिका आहे.त्यामुळे दरवर्षी मोठा उत्सव होतो. परिसरातील व नगरमधील सुमारे १५ हजार भाविक उपवास सोडण्यासाठी आले होते तर देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त द्वादशीच्या दिवशी गावातून रथयात्रा काढण्यात आली होती.
उत्सावानिमित्त आषाढी सप्ताह,अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला. यामध्ये अक्षय महाराज उगले (जे.हैबती, नेवासा),पंढरीनाथ महाराज दळवी(अरणगांव),अनिल महाराज जाधव शास्त्री (घोडेगाव),किरण महाराज कोल्हे(संगमनेर),अमोल महाराज घाडगे(शेवगाव), संकेत महाराज गांडुळे(राहुरी),संदिप महाराज गवांदे (भागवताचार्य) संगमनेर यांची कीर्तने झाली.
दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.या सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन, नियोजन श्री पांडुरंग बुवाजीबुवा समाधी देवस्थान ट्रस्ट,अरणगाव व समस्त ग्रामस्थ अरणगाव यांनी केले होते.