खर्चाला फाटा देत, शालेय साहित्य वाटप करून वाढदिवास साजरा!

शिवबा संघटनेचा सामाजिक उपक्रम..
.
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यात सामिजिक कार्य करण्यास शिवबा संघटना नेहमीच तत्पर असते. कोरोना काळात नागरिकांना घरोघरी पोषण आहार , दुर्ग गड किल्ले संवर्धन स्वच्छ्ता मोहीम, पूरग्रस्त ठिकाणी दैनंदिन गरजेच्या वस्तू देऊ करून, शैक्षणिक ,कला ,क्रीडा ,आरोग्य विभागात संघटनेचे अधिकारी व पदाधिकारी नेहमीच मोलाची भूमिका बजावत.
वाढदिवसाच्या अंदाधुंदी खर्चाला आळा घालीत, जिल्हा परीषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम राबविला.
शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध ठिकाणी देविभोयरे
गावठाण,बेंदवस्ती,माळवाडी,तुकाईवाडी,सरडेमळा आदि जिल्हा परीषद शाळेत शालेय साहित्य वहि वाटप करण्यात आले. शिवबा संघटना नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करत आहे. म्हणूनच सर्वसामान्य जनतेची शिवबा संघटना असल्याचे अनिल शेटे यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड, शिवबा दुर्गसंवर्धन समिती प्रमुख राजुभाउ लाळगे,सेवा सोसायटी संचालक संतोष लामखडे,रविकांत गाजरे,शरदजी बोरुडे,भाऊसाहेब सरडे,गणेश बेलोटे,विजय मुळे,दत्तात्रय बेलोटे,जगदंबा पतसंस्था मॅनेजर रावसाहेब वाढवणे,विश्वनाथ बेलोटे,सेवा सोसायटी संचालक मंगेशजी मुळे,ग्रामपंचायतसदस्य शंकर सरडे, गणेश बेलोटे,जगन्नाथ मगर,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मुळे,विजय सरडे,वैभव बेलोटे,सोयल मोमीन,संतोष मंडले,रविंद्र जाधव,अनिल बेलोटे,बाळु मंडले,भाऊ मंडले आदि उपस्थित होते.
शिवबा शेतकरी संघटना प्रमुख जयराम सरडे यांनी सूत्रसंचालन केले.तर सर्वाचे आभार सेवा सोसायटी संचालक मंगेश मुळे यांनी आभार मानले.
