इतर

शेवगाव येथील विद्या भडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील विद्या रामभाऊ भडके यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नुकतेच नाशिक येथे झालेल्या एका कार्यक्रमात या पुरस्कार सोहळ्याचे वितरण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य शब्दगंध साहित्य परिषदचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक सरचिटणीस साहित्यिक सुनील गोसावी, प्रसिद्ध कवयित्री शर्मिलाताई गोसावी,माजी पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, शब्दगंधचे शेवगाव तालुका अध्यक्ष हरिभाऊ नजन, डॉ. अशोक कानडे, शाहीर भारत गाडेकर, ज्येष्ठ पत्रकार आर. आर. माने, ग्रामीण पत्रकार संघाचे रवींद्र मडके, शहाराम आगळे सुनील पहिलवान,ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव चव्हाण, उमेश घेवरीकर, सुरेश शेरे, बापूसाहेब गवळी, तुकाराम जाधव यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.

शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व शब्दगंधचे सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच शेवगाव येथे एका विशेष कार्यक्रमात कवयत्री विद्याताई भडके यांचा शब्दगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य शेवगाव तालुक्याच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्यांनी साहित्य क्षेत्रातही चांगले काम केल्यामुळे त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो.

हरिभाऊ नजन
अध्यक्ष-शेवगाव तालुका
महाराष्ट्र राज्य शब्दगंध साहित्य परिषद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button