हभप डॉ नारायण महाराज जाधव यांना वारकरी भूषण पुरस्कार प्रदान

पारनेर प्रतिनिधी,
आद्य जगदगुरू श्रीमद शंकराचार्य श्री विश्वात्मक वारकरी पीठ यांच्या वतीने देण्यात येणारा आद्य जगदगुरू श्रीमद शंकराचार्य यंदाचा वारकरी भूषण पुरस्कार डॉ जाधव महाराज यांना देण्यात आला.
श्री शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने संत पंढरी पिंपळगाव वाघा येथे पाच दिवशीय किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारंची किर्तने संध्या 7-9 वेळात झाली यावेळी दररोज दुपारी 4-6यावेळात आ. ज. श्री. श. प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष कृष्णकृपाकित डॉ विकासानंदजी महाराज मिसाळ यांनी शंकराचार्य जीवन चरित्र कथा सांगितली.या पर्व काळात दि 05/05/2022रोजी नगर जुन्नर पारनेर राहुरी श्रीरामपूर जुन्नर आंबेगाव या तालुक्यातील जवळपास 61दिंड्या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या.
दि 06/05/2022रोजी शंकराचार्य जयंती दिवशी हभप वाघ महाराज यांच्या कीर्तनच्या समारोपनंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. हा पुरस्कार हभप छगन महाराज मालुसरे श्री क्षेत्र बाळनाथ गड, हभप. जंगले महाराज शास्त्री, हभप वाघ महाराज आणि नाना महाराज ठुबे गुरुजी यांच्या हस्ते प्रेममूर्ती डॉ नारायण महाराज जाधव यांना प्रदान करण्यात आला.
श्री शंकराचार्य यांची मूर्ती प्रमाणपत्र आणि रोख 13 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ.जाधव बाबा यांचे वारकरी संप्रदाय मधील योगदान, त्यांची लेखन संपदा, संप्रदायावरील त्यांचा विश्वास वेद अध्ययन आणि अध्यापन, त्याग, भक्ती आणि वैराग्य यामुळे डॉ बाबा यांची नाही तर या पुरस्काराची महती वाढली असे जंगले महाराज शास्त्री यांना मत व्यक्त केले.
डॉ बाबा यांचा श्री क्षेत्र आळंदी येथे मठ नाही, कुठेही संस्था नाही एका दात्याने राहण्यासाठी खोली, पाठसाठी एक हॉल दिला आहे. त्यातच बाबा दररोज वेदांतचे आणि इतर धर्म ग्रंथ चे पाठ घेतात आणि हजारो विद्यार्थ्यांना बाबांनी ज्ञान दान केले आहे नव्हे नव्हे तर बाबा चालते बोलते ज्ञानाचे विद्यापीठच आहे अशीच भावना वारकऱ्यांची आहे.
दि.07/05/2022 रोजी सकाळी 9-11रोजी हभप डॉ विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या किर्तन ने या महोत्सवाचा समारोप झाला पंचक्रोशीतील हजारो लोकांनी या अन्नदान आणि ज्ञान दानाचा लाभ घेतला.
