राजापूर च्या नूतन महा विद्यालयात शास्त्रज्ञाच्या भेटीने जिंकली विद्यार्थ्यांची मने

सांगमनेर- दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर येथे शास्त्रज्ञ आपल्या भेटीला हा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी महाविद्यालयाचे ‘प्राजक्त’ या वार्षिक अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संगमनेर तालुक्याचे भूषण डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सहकारी व थोर शास्त्रज्ञ डॉ. रावजी शिंदे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून भारतात प्राचीन काळापासून ते आजतागायत झालेल्या वैज्ञानिक शोध आणि संशोधनाचे महत्त्व विषद केले. तसेच सूक्ष्म चुंबकीय नियमांचा उपयोग करून त्यांनी स्वतः केलेल्या संशोधना संदर्भात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक यांना निश्चितच प्रेरणा मिळेल.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार व सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष मा. डॉ. सुधीर तांबे साहेब उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून देशाच्या प्रगतीसाठी शास्त्रज्ञांची फार मोठी गरज आहे. आणि ग्रामीण भागात शिक्षण घेवूनही मोठे शास्त्रज्ञ होता येते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे शास्त्रज्ञ डॉ.रावजी शिंदे हे आपल्यासाठी एक आदर्शच आहेत असे मत व्यक्त केले.
यावेळी पेटंट व पुस्तक प्रकाशन करणाऱ्या प्राध्यापकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रागतिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. अनिल गोडसे साहेब, सचिव ॲड. कैलास हासे साहेब व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नूतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष डी. कडलग, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पंढरीनाथ पथवे, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांनी तर परिचय प्रा.किशोर देशमुख यांनी करून दिला. तसेच मान्यवरांच्या सत्काराची सुत्रे विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. प्रविण आहेर यांनी सांभाळली.आणि सुत्रसंचालन प्रा.साईसुधा बच्चा मॅडम यांनी केले.