इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि १३/०७/२०२२

🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २२ शके १९४४
दिनांक :- १३/०७/२०२२,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०८,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पौर्णिमा समाप्ति २४:०८,
नक्षत्र :- पूर्वाषाढा समाप्ति २३:१९,
योग :- ऐंद्र समाप्ति १२:४४,
करण :- विष्टि समाप्ति १४:०५,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – पुनर्वसु,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- वृषभ(१०:५०नं. मिथुन),
राशिप्रवेश :- शुक्र – मिथुन १०:५०,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:३५ ते ०२:१३ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ सकाळी — सकाळी ०६:०२ ते ०७:४० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:४० ते ०९:१८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५७ ते १२:३५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:३० ते ०७:०८ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
गुरुपौर्णिमा, व्यासपूजा, संन्यासिनां चातुर्मास्यारंभ, कुलधर्म, मन्वादि, भद्रा १४:०५ प.,
————–

वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
📞 करमाळा ळा: 🌏

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २२ शके १९४४
दिनांक = १३/०७/२०२२
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
आज भाग्याची साथ मिळेल. आज कार्यक्षेत्रात तुमची कामगिरी चांगली होईल. तुमच्याकडे असलेल्या बोलण्याच्या कलेने तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोचू शकता. तुम्हाला कामात यश, नवीन नोकरी मिळेल. तुमचा मानसिक कंटाळा व थकवा आज संपेल तसेच चहूबाजूंनी चांगली बातमी मिळेल.

वृषभ
आजचा दिवस चपळतेने परिपूर्ण असेल. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल. एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट संस्मरणीय असेल. कोणत्याही विवाह समारंभात किंवा मंगल समारंभात सहभागी देखील होऊ शकता. मन आनंदी असेल. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. प्रेमसंबंधात यश मिळेल.

मिथुन
आज कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा त्या प्रत्यक्षात उतरू शकतात. तुम्हाला भाग्याची जोड मिळेल. कौटुंबिक आनंद अनुभवता येईल, आज तुम्ही आनंदी असाल आणि हा दिवस तुम्ही हसत-खेळत घालवाल. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील.

कर्क
मन आज प्रसन्न असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, प्रवासाचा आनंद अनुभवाल तसेच व्यवसायात चांगला फायदा होईल. आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल.

सिंह
तुमचे कठोर परिश्रम आणि समजूतदार स्वभाव तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. कुटुंबाच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहाल. आजची सुरुवात चांगली होणार आहे. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल.

कन्या
नशीब तुमच्या सोबत आहे. कामात उत्साह पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कार्य योजना पूर्ण कराल. कौटुंबिक सुख मिळेल. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येईल.

तूळ
संपूर्ण दिवस ताजातवाना जाईल, नोकरीत यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक कलह संपुष्टात येईल. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही, परंतु त्यांचा पराभव करण्यात तुम्ही मात्र यशस्वी व्हाल. तुम्हाला कुटुंबाची साथ नक्कीच मिळेल, त्यामुळे हिंमत हारू नका आणि समोरच्या कठीण परिस्थितीला निकराने सामोरे जा. आज नशीब तुमच्या सोबत असणार आहे.

वृश्चिक
आज नशिबाची साथ आहे, तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या बोलण्यात गोडवा असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमचे काम यशस्वी कराल. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. तुम्ही पैसेही वाचवू शकता. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल.

धनु
कार्यक्षेत्रात येणार्‍या संकटांपासून मुक्ती मिळू शकते. तुमची सर्व कामे यशस्वी होतील. आज व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्य सामान्यतः चांगले राहील. बर्‍याच दिवसांनी तुम्हाला कोणालातरी भेटण्याची संधी मिळेल. आज नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरेल. तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. मनोरंजनाच्या साधनांमध्ये तुम्हाला रस असेल.

मकर
आजचा दिवस फारसा चांगला जाणार नाही, तुम्हाला संघर्षात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी तुम्हाला कुटुंबाची साथ नक्कीच मिळेल, त्यामुळे हिंमत हारू नका आणि येणार्‍या कठीण परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जा. आज कामात तुमची कामगिरी चांगली राहील. कार्यक्षेत्रात आजचा दिवस लाभदायक ठरेल.

कुंभ
आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. नोकरी किंवा कौटुंबिक आनंदासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज व्यापारी वर्गाला विशेषत: चांगले परिणाम मिळतील, त्यामुळे धन आणि लाभाचे योग येतील.

मीन
आजचा दिवस संस्मरणीय असेल. गोड वाणीने आणि हुशारीने कामात यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या हुशारीचा दाखला देत कामात यशस्वी व्हाल, नोकरी करणार्‍या लोकांची वरिष्ठांकडून प्रशंसाही होईल. कुटुंबातील सदस्यांकडून शक्य ते सर्व सहकार्य मिळेल.

वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button