इतर

आजचे पचांग व राशिभविष्य दि.०३/०३/२०२५


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फल्गुन १२ शके १९४६
दिनांक :- ०३/०३/२०२५,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३५,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- फाल्गुण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति १८:०३,
नक्षत्र :- अश्विनी समाप्ति २८:३०,
योग :- शुक्ल समाप्ति ०८:५७, ब्रह्मा २९:२४,
करण :- वणिज समाप्ति ०७:३१, बव २८:३८,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – शततारा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०६नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०८:१६ ते ०९:४४ पर्यंत,

लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:४८ ते ०८:१६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:४४ ते ११:१३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:०६ ते ०६:३५ पर्यंत,

❀ दिन विशेष:
विनायक चतुर्थी, भद्रा ०७:३१ नं. १८:०३ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन १२ शके १९४६
दिनांक = ०३/०२/२०२५
वार = इंदुवासरे(सोमवार)

मेष
दिवस सौख्याचा असेल. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. जोडीदाराचे प्रेमळ सुख मिळेल. भागीदारीत चांगला नफा होईल. मोठ्या लोकात ऊठबस होईल.

वृषभ
कामाचा चांगला आनंद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही समाधानी असाल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. जवळच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. काही बाबींची गुप्तता पाळाल.

मिथुन
स्त्रियांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवाल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. जोडीदाराचे वर्चस्व राहील. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. करमणुकीत वेळ घालवाल.

कर्क
घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. घराची सजावट कराल. तुमच्यातील सुप्त गुण दिसून येतील.

सिंह
जवळचा प्रवास मजेत पार पडेल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. उत्तम साहित्य वाचनात येईल. काहीसे लहरीपणे वागाल. चारचौघात मिळून-मिसळून वागाल.

कन्या
कौटुंबिक वातावरणात रमून जाल. चैनीवर खर्च कराल. सर्वांशी मधाळ बोलाल. गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधाल. पारंपरिक कामातून चांगला लाभ होईल.

तूळ
वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. दिवस छानछोकीत घालवाल. प्रेमळ मैत्री लाभेल. प्रेमप्रकरणातील सौख्याला बहर येईल. सौंदर्यवादी दृष्टीकोन ठेवाल.

वृश्चिक
मनात उगाच चिंता लागून राहील. घरातील ताणतणाव दूर करावेत. आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू नये. छोटा-मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. अति वाहवत जाऊ नका.

धनू
घरात मंगलकार्ये घडतील. स्वत:ची मानसिक शांतता जपावी. समोर आलेली कामे मन लावून करावीत. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. उगाच कोणाशीही शत्रुत्व घ्यायला जाऊ नका.

मकर
वारसाहक्काची कामे मार्गी लावाल. उगाच नैराश्याला बळी पडू नका. कामाची घाई गडबड राहील. कामात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. जास्त चिकित्सा करत बसू नका.

कुंभ
प्रकृती काहीशी नरमगरम राहील. पित्तविकार वाढू शकतो. कामात क्षुल्लक कारणावरून अडथळे येवू शकतात. मानपमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. शांतपणे विचार करावा.

मीन
कामाचे प्रशस्तिपत्रक मिळेल. मनातील इच्छांची पूर्तता होईल. कामाच्या ठिकाणी दर्जा सुधारेल. शेअर्समधून चांगली कमाई करता येईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button