राधिका फाउंडेशन च्या अंबड शाखेचे उद्घाटन आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ थाटामाटात संपन्न….

नाशिक प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
आज दिनांक १८जानेवारी २०२५रोजी राधिका फाउंडेशनच्या अंबड शाखेचे उद्घाटन आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ प्रमुख अतिथी आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय थाटामाटा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर चेतना सेवक या होत्या तर कार्यक्रमाच्या आयोजक सौ गायत्री लचके या होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये
श्री सुनील पवार -, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड पोलीस स्टेशन
श्री. विश्वास लचके – नाशिक लोकशाही न्यूज संचालक
सौ भाग्यश्री ताई ढोमसे, -माजी नगरसेविका –
सौ नंदिनी कहांडळ – मातोश्री रामप्यारी बाई सारडा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका,
श्रीमती वृषालीताई तूप साखरे,
तूप साखरे लॉन्स च्या संचालिका
सौ अर्चना मानकर – मानकर बॅग हाऊस च्या संचालिका ,
सौ सुनीता शिंपी- महिला अध्यक्ष क्षत्रिय आहेर शिंपी समाज, सिडको
डॉक्टर सुमीती कौर पाटील, स्त्री रोग तज्ञ –
ॲडव्होकेट प्रेरणा काळुंखे- माजी अध्यक्ष ग्राहक तक्रार निवारण आयोग
ॲडव्होकेट अनिता जगताप-
याचप्रमाणे राधिका फाउंडेशनच्या कार्यकारणी मधील सर्व सदस्य जसे
राधिका फाउंडेशनचे
अध्यक्ष -श्री लाला ठक्कर
उपाध्यक्ष – वंदना बनकर
सल्लागार अध्यक्ष – कल्याणराव पाटील
खजिनदार – श्री अनिल नहार
सचिव – श्री जावेद शेख
ब्रँड अँबेसिडर – हर्षाली भोसले
मखमलाबाद शाखाध्यक्ष – श्री संदीप काकड
बागलाण शाखा अध्यक्ष -श्री अरविंद सोनवणे
निफाड शाखा अध्यक्ष श्रीमती जयश्री भटेवरा,
पत्रकार डॉक्टर श्री शाम जाधव आणि, डॉक्टर अशोक बन्सी पगारे, पंचवटी वाझट परिवार , प्रकाश काळे विनोद जैन,
त्याचबरोबर राधिका फाउंडेशन अंबड शाखा पदाधिकारी मधून
अंबड शाखा अध्यक्ष सौ गायत्री लचके
उपाध्यक्ष सौ सुनीता केदारे
सचिव सौ अर्चना दिंडोरकर
संघटक सौ आशा ताई सोनवणे
कार्यध्यक्ष सौ हर्षदा भावसार
सहकार्याध्यक्ष सौ कविता नवाळे
इत्यादी सर्व उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबड शाखा सचिव सौ अर्चना दिंडोरकर, सौ छाया परेवाल आणि राजश्री भावसार यांनी केले… कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या दीप प्रज्वलनाने झाली… प्रास्ताविक कार्यक्रमाच्या आयोजक सौ गायत्री लचके यांनी केले… तर राधिका फाउंडेशन चे उद्दिष्ट आणि त्या संदर्भाची संपूर्ण माहिती श्री सुरेशजी चव्हाण यांनी दिली,
कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना माननीय आमदार सौ सीमाताई हिरे म्हणाल्या की राधिका फाउंडेशनची संस्थची शाखा या भागात सुरू झाल्याने या भागातील महिलांना विद्यार्थ्यांना गरजू व्यक्तींना योग्य ती मदत वेळेत मिळेल, महिलांसाठी खुले व्यासपीठ मिळेल, सामाजिक कार्य या भागात पण सुरू राहतील, अशा सर्व उद्दिष्टांनी परिपूर्ण अशा अंबड शाखेचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे तसेच सीमाताई यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ चेतना ताई या आधुनिक युगाची सावित्रीबाई फुले आहे
असे आमदार सीमाताई म्हणाल्या, आणि या शाखेच्या अनावरण प्रसंगी त्यांनी राधिका फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष चेतनाताई सेवक तसेच अंबड शाखा अध्यक्ष सौ गायत्री लचके यांना भरभरून शुभेच्छा दिल्या… संस्थेच्या या शाखेसाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
कार्यक्रमात सुधाकर आय क्लिनिक, व अशोका हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर प्राजक्ता जठार आणि डॉक्टर हर्षदा तळेगावकर यांच्या प्रयत्नातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले… त्याचाही लाभ उपस्थित महिलांमधून सर्वांनी घेतला.. आणि त्यासाठी आभार देखील व्यक्त केले..
महिलांसाठी खूप छान असा उखाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला वेगवेगळ्या स्पर्धंचे नियोजन झाले आणि लकी ड्रॉ पद्धतीने बक्षीसे देखील काढण्यात आली… अशी खूप सगळे बक्षीस आहे उपस्थित महिलांमधून देण्यात आली… त्यामुळे महिलांचा उत्साह गगनात मावत नव्हता..
तसेच या कार्यक्रमासाठी सिडको अंबड परिसरामधून मालती सोनवणे, जयश्री चौधरी, स्वाती खर्डे, कविता सोनवणे, रुक्मिणीबाई सुबंध, कलपना शिंपी, रोहिणी गायकवाड, राजश्री भावसार, पुनम गायकवाड, भारती जाधव, रेखा काळे, लता थोरात, कोमल धोंडगे, रोहिणी सोनार, फरझाना शेख, सुरेखा मैंद, रेखा काकड इत्यादी बऱ्याच महिला उपस्थित होत्या.
