इतर
साम्रद रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे , ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे -विजय पवार

घाटघर -साम्रद रस्ता चा ठेकेदार स्थानिक मजुरांची मजुरी बुडवून पसार!
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील घाटघर ते साम्रद रस्ता काँक्रीटकरण काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी आरपीआयचे युवा तालुकाध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे

श्री विजय पवार व सामाजिक कार्यकर्ते मंगळा पटेकर यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर या कामाची नुकतीच पाहणी केली असता हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून आले सदर कामाचा ठेकेदार आणि राजुर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या संगनमताने रस्त्याचा दर्जा घसरला आहे असून कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करण्यात आले या कामात मोठ्या प्रमाणावर गैर व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे

सदर कामाचे कंत्राटदार यांनी आदिवासी भागातील कामावरील मजुरांचे पैसे बुडवून पलायन केले आहे परिसरातील स्थानिक मजुराने मजुरांची मजुरी थकवल्याने या कंत्राटदाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कामाची चौकशी करावी व संबंधित कंत्राट दाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा बांधकाम कार्यालयासामोर उपोषण करण्याचा इशारा त्यानी दिला आहे