अगस्ती नंतर अमृतसागर दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!

सुनील गीते
अकोले -अगस्ती साखर कारखाना निवडणुकीनंतर आता अकोले तालुक्यात सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असणाऱ्या अमृतसागर दूधउत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित अकोले या शिखर संस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे यामुळे अकोले तालुक्यात अगस्तीच्या निवडणूक रणधुमाळी नंतर आता पुन्हा दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे
भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाचा कारभार सुरू आहे
अगस्ती कारखान्यात चे निवडणुकीत पिचड यांचा दारुण पराभव केल्यानंतर आमदार डॉ किरण लहामटे, अगस्तीचे चेअरमन सिताराम पाटील गायकर, जेष्ठ नेते अशोकराव भांगरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची नेते यांनी दूध संघाच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे अगस्तीच्या सत्तांतरांतर नंतर अकोल्यात होणारी ही पहिली निवडणूक आहे या निवडणुकी नंतर लगेच अकोले कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे यामुळे या निवडणुकी कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे
अमृतसागर सहकारी दूध संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे
सर्वसाधारण मतदारसंघात -10,
महिला राखीव मतदार संघात -2
इतर मागासवर्ग मतदार संघात- 1
अनुसूचित जाती जमाती मतदार संघात- 1
विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष प्रवर्गात- 1 अशा 15 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे
निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे-
दिनांक 11 नोव्हे 2022 पासून नामनिर्देशन पत्र तथा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 17 नोव्हेंबर 2022 पर्यत दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत तर 18 नोव्हेंबर 2022 रोजी प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येईल व 21 नोव्हेंबर 2022 रोजी आलेल्या अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, दिनांक 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2022 रोजी दु 3 वा पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे व त्यानंतर दिनांक 6 डिसेंबर22 रोजी आलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल 18 डिसेंबर2022 रोजी सकाळी8 रे दु 4 वाजेपर्यंत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्या नंतर सायंकाळी मतमोजणी होणार आहे असे निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले आहे
— —