राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

प्रतिनिधी:
( संजय महाजन )
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे आणि ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती अनुजा गोसावी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमांमधील विद्यार्थी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषामध्ये उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकनंद यांच्या बद्दल विद्यार्थ्यांनी मनोगते सादर केली. चि. रुद्र शिंदे, कुमारी प्रज्ञा जाधव, कुमारी शिवानी जाधव, कुमारी माही गायकवाड, चि. राजकुमार पाटील, कुमारी आदिती पोवार आणि कुमारी दर्शना पालकर यांनी आपली मनोगते सादर केली.
कार्यक्रमानिमित्त शिक्षक मनोगत झाली. श्रीमती शुभांगी कड्डु यांनी राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल माहिती सादर केले. माहिती सादर करत असतांना राजमाता जिजाऊ यांनी घडवलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला.
दुसऱ्या शिक्षक मनोगताद्वारे श्री. रामनाथ ढाकणे यांनी स्वामी विवेकानंदा बद्दल माहिती सादर करतांना स्वामी विवेकानंदांनी कशाप्रकारे भारतीय संस्कृती आणि भारतीय ज्ञान सातासमुद्रापार नेले याची विविध किस्से विद्यार्थ्यांसमोर सादर केली.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. धनंजय काळे आणि त्यांच्या सहकार्याने केले. सूत्रसंचालन श्री. सोमनाथ ढुमणे यांनी तर आभार श्री. धनंजय काळे यांनी मानले. कार्यक्रमाची चित्रीकरण श्री संजय पालवे यांनी केले. कलाशिक्षक श्री. विक्रम शिंदे यांनी सुंदर फलक लेखन केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिक्षक व सेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.