संस्कृतीची व विकासाची गंगा महिलांच्या सहभागातून. . शिवाजीराव फटांगरे.

संगमनेर- जगाच्या इतिहासात मागे वळुन पाहिले तर महिलांचा सहभाग वगळता इतिहास लिहिला तर तो इतिहास म्हटला जाणार नाही.राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब , सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई,या क्रांतिकारी महिलांनी ख-या अर्थाने जगासमोर खरा इतिहास निर्माण केला.त्यातुनच जगाचा विकास झाला.आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.आपल्या देशात प.बंगाल उत्तराखंड मेघालय या भागात महिला प्रधान संस्कृती आढळुन येते.त्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचे विकासात योगदान दिसते.असे शिवाजीराव फटांगरे म्हणाले
आज मराठा पतसंस्थेने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मा.सौ.आशाताई भांगरे संस्थापक चेअरमन गृहलक्ष्मी पतसंस्था मर्या संगमनेर यांची सहकार व शिक्षण क्षेत्रातील काम पाहुन सत्कार करण्यासाठी जी निवड केली ती अतिशय सार्थ आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संचालक श्री काशिनाथ डोंगरे म्हणाले की, मराठा पतसंस्था फक्त ठेवी गोळा करणे व कर्ज वाटप करणे एवढेच सिमीत काम करीत नाही.तर समाज्यामध्ये राजकारण विरहित ज्या ज्या महिला अगर पुरुष यांचे काम आदर्श आहे.आणि समाज्याला आदर्श देणारे आहे.अशा माणसांची निवड करुन त्यांचा कामाची नोंद समाज्याने घ्यावी.व त्यातुन समाज्यात चांगले बदल व्हावेत या उद्देशाने संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या नेतृत्वाचा सन्मान करते.शाखा
कमीटीकडे 30नावे आली होती.पण कमीटीने सौ.भांगरे मॅडम यांचे नाव निश्चित केले.आज महिला दिनाच्या निमित्ताने सत्कार आयोजित केला. मा.सौ.भांगरे मॅडम यांचा सत्कार समाजसुधारक शिक्षण महर्षी मा.श्री सोमनाथ कळसकर गुरुजी यांचे हस्ते करण्यात आला.
युवा वार्ता चे संपादक मा.श्री किसन भाऊ हासे म्हणाले की महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी फक्त शाळेत साज-या केल्या जातात.खर तर महापुरुषांच्या कामाची नोंद घेण्याची व इतिहास कायम प्रेरणादायी राहायला हवा म्हणुन हे उत्सव संस्थांनी साजरे केले पाहिजे.पण दूदेर्वाने तसे होत नाही याला अपवाद मराठा पतसंस्था आहे.ही अभिमानास्पद बाब आहे. मा.श्री कळसकर गुरुजी म्हणाले की, मराठा पतसंस्थेने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मा.सौ.भांगरे मॅडम यांची केलेली निवड अतिशय योग्य आहे.व योग्य व्यक्तीचा सन्मान आहे.त्याबद्दल मी व्यवस्थापनाला धन्यवाद देतो.संचालक श्री काशिनाथ डोंगरे यांचे काम अतिशय दुरदर्शी आहे.संस्था कशी चालवावी कर्मचारी कसे सांभाळले पाहिजे तसेच सभासद व ठेवीदार व कर्जदार यांना कसे जवळ केले पाहिजे विश्वासात घेतले पाहिजे हे डोंगरे सो यांचेकडून शिकले पाहिजे.जोपर्यत डोंगरे सो यांचे सारखे संचालक आर्थिक संस्थांमध्ये काम करतील तोपर्यंत मराठा पतसंस्था समाज्यात आदर्श संस्था म्हणून काम करील.मी भांगरे मॅडम यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा देतो. सत्काराला उत्तर देताना सौ.भांगरे मॅडम म्हणाल्या की,स.न1986 सांली माझ्या मनात या समाजातील उपेक्षित वर्गासाठी काम करण्याचा विचार आला.आणि मी आर्थिक संस्था काढण्याचा निर्णय घेतला.म्हणुन मी गृहलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या संगमनेर ची स्थापना केली यामध्ये सर्व महिला सभासद व कर्मचारीही महिला आहेत.शुन्य टक्के NPA असलेली ही पतसंस्था असुन एकही पैशाचा अपहार केल्याचे उदाहरण नाही.आजच्या पुरूष प्रधान संस्कृतीत अजुनही महिलांना सहकारी संस्थामध्ये 50% प्रतिनिधीत्व नाही.याचा खेद आहे.काम करताना जर तुमची तळमळ खरच समाज्यासाठी असेल तर संस्था चांगल्या चालतात.पण तुम्ही जर काही स्वार्थी हेतूने संस्था चालवित असले तर काय होते.हे आज समाजात दिसत आहे.म्हणुन पवित्र भाव व वृत्ती जोपासली तर काम चांगले होते.व समाजाला प्रेरणा देते.मराठा पतसंस्थेने माझा महिला दिनाच्या निमित्ताने केलेला सत्कार हा कायम स्मरणात राहील.मी संस्थेला धन्यवाद देते. आभार प्रदर्शन करताना श्री शांताराम घुले सर म्हणाले की, सहकारीतील सर्व उन्हाचे चटके सहन करुन संचालक श्री काशिनाथ डोंगरे हे सार्वजनिक जीवनात बनलेले नेतृत्व आहे.म्हणुन या संस्थेला निश्चित भविष्य आहे.आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालेबद्दल सर्वाचे आभार मानले या प्रसंगी बी जे आमटे संदीप शेळके,सौ.भोसले सौ.गुंजाळ सौ.संगिता गायकवाड व इतरही सभासद हजर होतो.या सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपला.