कर्वे समाज सेवा संस्थेतील विद्यार्थीनी जाणून घेतला कामगार संघटना व कामगार चळवळीचा इतिहास

पुणे दि 23
कर्वे समाज सेवा संस्था मधील Master in Social Work (HRM) चे विद्यार्थी अभ्यास उपक्रम च्या अंतर्गत कामगार संघटना व कार्य या विषया वर भारतीय मजदूर संघ पुणे कार्यालयात मार्गदर्शनपर भेटीसाठी आले होते, या वेळी कामगार चळवळीचा इतिहास, भारतीय मजदूर संघाचे योगदान, कार्यपध्दतीविषयी, संघटीत असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या समस्या, कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न, आगामी योजना, आव्हाने , उपलब्धी बाबतीत या सविस्तर माहिती , व प्रश्न उत्तरे च्या माध्यमातून देण्यात आली.
कामगार प्रश्न सध्यस्थिती आणि एच आर ऑफिसर भूमिका याबाबत विश्लेक्षणात्मक चर्चा झाली.
या वेळी अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, बिडी कामगार महासंघाचे कार्याध्यक्ष अॅड उमेश विस्वाद, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाचे उपमहामंत्री राहूल बोडके, हेंल्कल अॅडीसीव्ह लि कुरकुंभ ता दौंड जि पुणे येथील कामगार प्रतिनिधी श्री सुनील गिरासे, मोहित जगताप व रितेश नारखडे व कर्वे समाज सेवा संस्था च्या समन्वयक प्रा डाॅ चित्रलेखा राजुस्कर व विद्यार्थी उपस्थित होते.