क्लास वन अधिकारी बनलेल्या शिवाचे मातृभूमीत जोरदार स्वागत!

कोतुळ प्रतिनिधी
दहावी पास झाला दहावीच्या वर्गात आणि केंद्रात प्रथम आला त्याच वेळी त्यानी अधिकारी बनण्याची खून गाठ बांधली आणि दहावी नंतर गाव सोडले घरी अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या शिवाने शालेय शिक्षण पूर्ण केले त्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर ची पदवी घेतली हे शिक्षण घेत असताना त्याने अतिशय खडतर शैक्षणिक प्रवास केला या शिक्षणातही तो नाशिक येथे कॉलेजला प्रथम राहिला पदवी पूर्ण केली
वडील पेंटिंग चा व्यवसाय व आई विडी कामगार मिळेल त्या तुटपुंज्या मजुरीतून आई वडील अशोक शेळके व शांता शेळके यांनी शिवाचा शैक्षणिक खर्च भागविला प्रसंगी शिवाच्या शैक्षणिक खर्च नातेवाईकांनीही उचलला शिवाने जिद्दीने पदवीनंतर पुणे गाठले पाच वर्षे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली या दरम्यान त्याने अनेक परीक्षा दिल्या आणि त्यात यशही मिळाले पण त्यात समाधान न मानता त्याने मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर ची परीक्षा उत्तीर्ण झाला या पदाची संधी हस्तगत करत असतानाच त्याने पंधरा दिवसात स्पर्धा परीक्षेतील वर्ग एक दर्जाच्या अधिकारी पदाची परीक्षा ही चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला
पंधरा दिवसात दोन संधी मिळविण्याचे मोठे यश त्याने गाठले
क्लासवन अधिकारी बनण्याचे स्वप्न शिवा अर्थात संतोष अशोक शेळके याने पूर्ण केले हे यश पदरात पाडून तो पुन्हा कोतुळ मध्ये आला स्वताचे मातृभूमीत आल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत करत गावातून मिरवणूक काढली मिरवणुकी नंतर ग्रामपंचयत कार्यालयाचे व्यसपीठावर शिवा तसेच त्याचे वडील अशोक नारायण शेळके तसेच शांता अशोक शेळके यांचा नागरी सत्कार केला

यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख,सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बी जे देशमुख,भाजपचे राजू पाटील देशमुख, माजी उपसरपंच गणेश पोखरकर भाऊसाहेब देशमुख, सयाजीराव देशमुख ऍड नेताजी आरोटे, अनिल खरात , यांनी आपल्या मनोगतात त्याचे कौतुक केले
यावेळी बाळासाहेब देशमुख उपसरपंच संजय देशमुख ,शिवाजीराव देशमुख, ताराबाई पवार, भरत देशमाने ,संजय लोखंडे, सोमदास पवार, नितीन पवार ,विकास देशमुख, बबलू देशमुख, शंकर घोलप, रावजी दराडे, नाथा शेळके, रवींद्र आरोटे, निवृत्ती लोखंडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
स्पर्धा परीक्षा लाखो लोक देतात मात्र सर्वांना त्यात संधी मिळत नाही विशिष्ट दृष्टिकोन ठेवून समन्वय साधत अभ्यास करणारे त्यात यशस्वी होतात राज्याच्या प्रशासनात काम करण्याची संधी शिवाला मिळाली ही अभिमानाची बाब आहे

प्रशासनात काम करताना समजाचे काम करण्याची संधीं मिळते हे पद समाजसेवेचे पद आहे गाडी बंगला या पुरते मर्यादित न राहता लोकां ची व्यथा कमी करण्याचे काम शिवाने करून कोतुळ ची मान उंचवावी ,आज पर्यंत या स्टेजवर पुढाऱ्यांची सत्कार झाले पण अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याची ही पहिली वेळ आहे यापुढे असे अनेक सत्कार होण्याची प्रेरणा या सतकातून मिळो अशी अपेक्षा श्री बी .जे. देशमुख यांनी व्यक्त केली
माझ्या यशात आईवडील नातेवाईक आणि ग्रामस्थांचा वाटा आहे ज्या पदावर मला संधी मिळेल त्या पदाला मी न्याय देईल असे यावेळी एमपीएससी परीक्षा पास होऊन वर्ग 1 पदावर निवड झालेल्या संतोष अशोक शेळके याने सांगितले