जांभळेवाडी जिल्हा परिषद शाळे साठी सिंजेंटा इंडिया प्रा. लि. पुणे यांचेकडून दहा लाखांचा निधी

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील जांभळेवाडी (सातेवाडी) येथील जिल्हा परिषद शाळेतील शाळेत मध्यान भोजन कक्ष/किचन शेडच्या बांधकामा साठी सिंजेंटा इंडिया प्रा. लि. पुणे यांचेकडून शाळेसाठी रु. दहा लाखांचा निधी दिला आहे
काल दि. २२/१/२०२५ रोजी जि. प. प्रा. शाळा जांभळेवाडी (सातेवाडी) येथे किचन शेड व स्टोर रूमच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सातेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री केशव बुळे यांचे अथक प्रयत्नांतून सिंजेंटा इंडिया प्रा. लि. पुणे यांचेकडून शाळेसाठी रु. दहा लाखांचा निधी मंजूर झाला असून समष्टी जनकल्याण बहूउद्देशीय संस्था छ. संभाजीनगर या स्वयंसेवी संस्थेमार्फत पहिल्या टप्प्यात शाळेस किचन शेड व स्टोर रूम बांधून देण्यात येणार आहे
.सदर कामाचे भूमिपूजन प्रसंगी संस्थेचे सचिव श्री सुनिल मगरे व त्यांचे सहकारी, शिक्षण विस्तार अधिकारी तथा शा.पो.आ. योजनेचे अधीक्षक श्री.अरविंद कुमावत, सरपंच श्री.केशव बुळे, शा. व्य. समिती अध्यक्ष श्री.जिजाराम मुठे, ग्रा.पं.सदस्य श्री. लक्ष्मण मुठे, शाळेचे मुख्याध्यापक श्री अजय चौधरी , त्यांचे सहकारी शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते