इतर
अहिल्यानगर-पुणे मार्गावरील वाहतुकीत २ जानेवारी २०२५ पर्यत बदल

अहिल्यानगर-पुणे महामार्गाजवळील भिमा-कोरेगाव (जि. पुणे) येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक जण १ जानेवारी २०२५ला येणार आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते २ जानेवारीच्या सकाळी ६ वाजेपर्यंत अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यायी मार्ग
बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक
बेलवंडी फाटा – देवदैठण – ढवळगाव – पिंपरी कोलंदर – उक्कडगाव – बेलवंडी – लोणी व्यंकनाथ – काष्टी – दौंड – पुणे
अहिल्यानगरकडून सरळ पुण्याकडे जाणारी वाहतूक
कायनेटिक चौक – अरणगाव बाह्यवळण – कोळगाव – काष्टी – दौंड – पुणे
अहिल्यानगरकडून पुणे मार्गे मुंबई, ठाणेकडे जाणारी वाहतूक
कल्याण बाह्यवळण रस्ता – आळेफाटा – ओतूर – माळशेज घाट मार्गे