संगमनेर च्या रेलिगेअर अॅग्रो लाईफ बायो सायन्स कंपनी चा आयसीएआर-सीरकोट ने पीक उत्पादन सुधारण्यासाठी विकसीत केलेल्या तंत्रज्ञान चा सामंजस्य करार!

अकोले / प्रतिनिधी
वनस्पतींच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि पीक उत्पादन सुधारण्यासाठी विकसीत केलेल्या आयसीएआर-सीरकोट च्या अभिनव तंत्रज्ञा ना नाचे रेलिगेअर अॅग्रो लाईफ बायो सायन्स प्रा. लि., संगमनेर यांच्यासोबत तंत्रज्ञान हस्तांतरण करार करण्यात आलाआहे
शास्त्रज्ञांच्या टिमने नॅानो झिंक सस्पेन्शन हे तंत्रज्ञान विकसित केले असुन यात डॉ. ए.के. भरिमल्ला, डॉ एन विघ्नेश्वरन, डॉ ए अर्पुथराज, डॉ मनोज कुमार महावर, डॉ कीर्ती जळगावकर, डॉ शर्मिला पाटील, डॉ शेषराव कौटकर आणि डॉ ज्योती ढाकणे-लाड यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
आयसीएआर-सीरकोट ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे रेलिगेअर अॅग्रो लाईफ बायो सायन्स प्रा. लि., संगमनेर यांच्यासोबत तंत्रज्ञान हस्तांतरण केले आहे. या सहयोगाचा उद्देश नॅनो-झिंक सस्पेंशनचा वापर करून कृषी उत्पादकता वाढवणे आहे, जे वनस्पतींच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि पीक उत्पादन सुधारण्यासाठी मदत करेल. या सामंजस्य करारावर आयसीएआर-सीरकोट चे संचालक डॉ. एस के शुक्ला व रेलिगेअर अॅग्रो लाईफ बायो सायन्स प्रा. लि. चे संचालक श्री. जी. टी. गाडेकर यांनी स्वाक्षरी केली यावेळी तंत्रज्ञान विकसित करणारे शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.
या धोरणात्मक भागीदारीतुन कापूस तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान या दोन्ही क्षेत्रांत लक्षणीय प्रगती दर्शवितात, ज्याचा उद्देश कापूस साठवणूक आणि वनस्पती आरोग्यामधील दीर्घकालीन आव्हानांना तोंड देणे आहे. या सहकार्यांद्वारे, ICAR-CIRCOT कृषी संशोधनामध्ये नावीन्यपूर्णतेचे नेतृत्व करत आहे, अधिक शाश्वत आणि कार्यक्षम कृषी परिसंस्थेसाठी अत्याधुनिक उपाय प्रदान करत आहे.