टाकळी ढोकेश्वर येथे साई सावली हाँस्पिटल आयोजित कोरोना योध्दा सन्मान सोहळा सम्पन्न!

साई सावली मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल ग्रामिण भागाला संजिवनी – शिवाजीराव शिर्के
दादा भालेकर
टाकळी ढोकेश्वर /प्रतिनिधी
साई सावली मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल ग्रामिण भागासाठी संजिवनी ठरले असून कोरोना महामारी काळात अनेकांना जिवदान मिळाले असल्याचे प्रतिपादन प्रेस क्लब चे अध्यक्ष व नगर सहयाद्रीचे शिवाजीराव शिर्के यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर)येथे साई सावली मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल आयोजित कोरोना योध्दा सन्मान सोहळा प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा मराठा संस्थेचे विश्वस्त सिताराम खिलारी,डाँ.शौकत सय्यद,डाँ.गौरव हराळ,डाँ.अमोल जाधवर,डाँ.भाऊसाहेब खिलारी,डाँ.आव्हाड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी श्री.शिर्के म्हणाले की,डिसेंबर २०२१ अखेर कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर आली असून भयानक स्थिती निर्माण झाली आहे.याकाळात सर्वांनी आपआपली काळजी घ्यावी.या महामारीमध्ये अनेक नामांकीत हाँस्पिटलला आँक्सिजन मिळाला नसल्याने अनेक रूग्ण दगावल्याच्या घटना असताना टाकळी ढोकेश्वर सारख्या ग्रामिण भागातील साई सावली मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलला मोठ्या प्रमाणात आँक्सीजन मिळाल्याने अनेक गोर गरीब रूग्णांचे रूग्णांचे प्राण वाचले.अनेक ठिकाणी आँक्सिजन प्लँन्ट सुरू झाले पण परिस्थिती भयानक आहे.सामाजीक भान ठेवून ग्रामिण भागातील सर्वच डाँक्टर काम करतात. विविध तज्ञ डाँक्टर दररोज या हाँस्पिटलला भेट देवून ग्रामिण भागातील रूग्णांना दिलासा देण्याचे काम करतात.
याप्रसंगी श्री.खिलारी म्हणाले की,टाकळी ढोकेश्वर सारख्या ग्रामिण भागामध्ये साई सावली मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल उत्तम आरोग्य सुविधा देत असून कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य गोरगरीब जनेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचण्याच मदत झाली.यासाठी अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले.
कोरोना काळात डाँक्टरांनी,स्टाप नर्स,वार्डबाँय यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हाँस्पिटलचा नावलौकीक वाढला असून यांच्याबद्दल समाजाने आदर दाखवत कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी प्रेस क्लब चे अध्यक्ष शिवाजीराव शिर्के, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे,दादा भालेकर,उदय शेरकर,सनी सोनावळे, भिकाजी धुमाळ, गंगा धावडे,संजय मोरे,बाळासाहेब गायकवाड,पोपट पायमोडे,गणेश जगदाळे,श्रीनिवास शिंदे आदी पत्रकारांचा व वैद्यकीय सेवा करणारे डॉ.मुकेश ठुबे, डॉ.स्वाती ठुबे,डॉ.विजय पुरी, डॉ.जयवंत निमसे,डॉ उदय बर्वे,डॉ.बाबासाहेब कावरे,डॉ श्रीकांत पठारे,डॉ.संदीप औटी,डॉ.विनायक सोबले,डाँ.मनोहर रांधवण यांसह साई सावली मल्टीस्पेशालीटी हाँस्पिटलचे कर्मचारी आण्णा वाघ,नाना झावरे,प्रसाद सोनावळे,नितीन आंधळे, गणेश चव्हाण,महेश सुळ,सुरज अरिंगले,जयेश झावरे,सुधीर जासूद आदींना कोरोना काळात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.भाऊसाहेब हिंगडे यांनी तर आभार डाँ.विजय पुरी यांनी मानले.
