आजचे पंचांग व राशिभविष्य दि २९/१२/२०२३

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०८ शके १९४५
दिनांक :- २९/१२/२०२३,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०१,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दितीया समाप्ति ०८:००,
नक्षत्र :- पुष्य समाप्ति २७:१०,
योग :- वैधृति समाप्ति २५:२८,
करण :- वणिज समाप्ति २०:४९,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- धनु – मूळ,(१८:१५नं. पू.चा.),
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वैधृति वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ११:०९ ते १२:३१ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:२४ ते ०९:४६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:४६ ते ११:०९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३१ ते ०१:५४ पर्यंत,
❀ दिन विशेष:
पूर्वाषाढा रवि १८:१५, भद्रा २०:४९ नं., मृत्यु २७:१० नं., तृतीया श्राद्ध,
————–
: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०८ शके १९४५
दिनांक = २९/१२/२०२३
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
आध्यात्मिक प्रगती चांगली करता येईल. मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. अति विचारात गुंतून जाऊ नका. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.
वृषभ
नवीन मित्र जोडता येतील. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वकष्टावर भर द्यावा. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. काही नवीन खरेदी केली जाईल.
मिथुन
व्यवसायात चांगला लाभ मिळेल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. वडीलांकडून मदत घेता येईल. कमिशन मध्ये लाभ होईल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
कर्क
आत्मविश्वासाने वागाल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे. मानसिक समाधान लाभेल.
सिंह
एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो. धार्मिक स्थळाला भेट देता येईल. आज उधार देणे टाळावे.
कन्या
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल..
तूळ
अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. परिस्थितीला नावे ठेऊ नका. उगाच चिडचिड करू नका.
वृश्चिक
मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आपले आवडते छंद जोपासा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. त्यांच्या आनंदाने खुश व्हाल.
धनू
कौटुंबिक सौख्यात दिवस घालवाल. मानसिक समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मनातील चिंता दूर साराव्यात.
मकर
लहान प्रवास घडेल. कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल. मानसिक चांचल्य जाणवेल. कसलीही हार मानू नका.
कुंभ
कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीचे व्यवहार आज टाळावेत. फसवणुकीपासून सावधानता बाळगा.
मीन
मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. त्यांचे कोडकौतुक कराल. दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक प्रश्न सुटेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर