सामाजिक उपक्रम राबवून वनकुटे येथे बुद्ध पौर्णिमा केली साजरी !

पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे बुद्ध पौर्णिमा सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.
याठिकाणी बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमासाठी उपस्थित प्रत्येक ग्रामस्थांना झाड भेट देण्यात आले. भीम गर्जना युवा प्रतिष्ठानने बुद्ध पौर्णिमेनिमित्त वनकुटे येथे हा सामाजिक उपक्रम राबविला.
भीम गर्जना युवा प्रतिष्ठान नेहमीच वनकुटे येथे सामाजिक कार्यक्रम घेऊन विविध उपक्रम राबवत असते. भीम गर्जना युवा प्रतिष्ठान चे सर्व युवा सहकारी वनकुटे येथे होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच सहभागी होत असतात सामाजिक दायित्व म्हणून वनकुटे येथे नेहमीच विविध आगळेवेगळे उपक्रम राबवत असतात. बुद्ध पौर्णिमेनिमित्त राबविलेला वृक्ष वाटप हा आदर्श उपक्रम आहे. यामुळे तथागत गौतम बुद्धांच्या प्रती आदर व प्रेम भावना व्यक्त करत यावेळी बुद्धपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी गावातील महिला वर्ग बेबी साळवे, छबुबाई साळवे, रीना साळवे, अश्विनी साळवे, रेखा बनसोडे, नंदा शहाणे, सुमन केदारी, मंदा जाधव, सुनिता केदारी, अलका सोनवणे, सुमन साळवे, जानकाबाई साळवे, शोभा साळवे, इंदुबाई साळवे, सुरेखा साळवे, उषा साळवे, शोभा विधाटे, अश्विनी केदारी, ज्योती केदारी, नविता साळवे, रोहिणी केदारी, सिंधुबाई साळवे, मच्छाबाई विधाटे, शोभाबाई साळवे, रेश्मा साळवे, लता साळवे, केसरबाई साळवे, इंदुबाई साळवे, विमल देवकर, अलका साळवे, सीमा बागुल, ताई साळवे, सुबाबाई बागुल, मनीषा केदारी, ज्योती साळवे, अनिता साळवे, हौसाबाई साळवे, अनिता साळवे, जया दोंदे, शालन शिंदे, छाया साळवे, सीमा साळवे, बेबी केदारी, पुष्पा साळवे, संगीता दोंदे, साकाबाई साळवे, आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच वनकुटे येथील भीमगर्जना युवा प्रतिष्ठानचे युवा सहकारी, पदाधिकारी तसेच वनकुटे येथील ग्रामस्थ कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.