राज्यभरातील लॉटरी विक्रेत्यांचा लॉटरी बंदीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

मुंबई दि २७- महाराष्ट्र राज्याची गौरवशाली परंपरा असलेली राज्य लॉटरी ही सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतल्यास कुटुंबियांसह मंत्रालयावर लॉटरी विक्रेते थेट चाल करतील आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी उग्र आंदोलने करतील असा सज्जड इशारा लॉटरी विक्रेत्यांचे नेते श्री विलास सातार्डेकर यांनी शनिवारी हजारो विक्रेत्यांच्या साक्षीने दिला.
दादर येथील वनमाळी हॉल मध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेतर्फे राज्य भरातील हजारो लॉटरी विक्रेत्यांची ‘इशारा बैठक’ आयोजित करण्यात आली होती
त्यात विक्रेत्यांनी घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला ‘लॉटरी वाचवा;विक्रेता जगवा!अशी मागणी राज्य शासनाकडे या सभेत करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की शासन म्हणजे फायद्याचे गणित करणारी प्रॉफिट गेमिंग कंपनी नाही तरीही लॉटरी नफ्यात आहे पण काही द्रष्ट मंडळी ही दिल्लीकरां च्या स्वार्थी तालावर ही लॉटरी बंद करायला निघाले आहेत. नगण्य असलेला तोटा फुगवून उभा करण्यात आलाय आपल्या भाषणात अनेक मुद्द्यावर त्यांनी लॉटरी विक्रेत्यांच्या अस्तित्वासाठी तसेच ग्राहक, सरकार यांच्या भल्यासाठी लॉटरीचे महत्त्व अधोरेखित केले.
संघटनेचे अध्यक्ष सुमित सातार्डेकर, सरचिटणीस राजेश बोरकर, मुंबई अध्यक्ष विनोद गाडेकर यांनीही विक्रेत्यांतर्फे सरकारकडे काही मागण्या केल्या ‘लॉटरीला अभय मिळाले तर आनंदोत्सव पण बंदी जाहीर झाल्यास मंत्रालय
दणाणून सोडायचा ही इशारा’ यावेळी देण्यात आला लॉटरी बंद झाल्यास मटका,जुगार असे बेकायदा धंदे वाढतील आणि कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडेल असे अध्यक्ष सुमित सातार्डेकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी व्यासपिठावर निलेश मानकर, महेश कोळी हे लॉटरी विक्रेत्यांचे नेते तसेच संघटनेचे उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा, आत्माराम नाटेकर, गुरुनाथ तिरपनकर, कार्याध्यक्ष राकेश उंबळकर, सदस्य रुचिता जाधव, अंबिका एजन्सीचे विलास निर्मळे, त्रिमूर्ती एजन्सीचे सत्यवान पेडणेकर,सिद्धी समर्थ एजन्सीचे ताराचंद सावंत, संजय पाल, किशोर धोत्रे, लॉटरी विक्रेता अशोक गुरव, सुरेखा कदम, उषाताई खंटागळे अंध विक्रेता संभाजी डोंगरे ईत्यादी उपस्थित होते अंध, अपंग, वयोवृद्ध, विधवा असलेले लॉटरी विक्रेते राज्यभरातून बैठकीसाठी उपस्थित झाले होते. सातार्डेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.