सत्तेचा वापर करून कराडला सोडवण्याचे षडयंत्र ; मनोज जरांगेचा खळबळजनक आरोप

प्रतिनिधी/दत्ता ठुबे
: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, देशवासियांना आज प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझ्यासोबत अनेकजण उपोषणाला बसलेले आहेत.काही जणांची तब्येत खराब होत आहे. पण आता सगळ काही आनंदी असून पण आमच्यावर अन्याय का? सरकार आमचा अंत पाहत आहे, असं ते म्हणाले आहे ल
आजपर्यंत अन्यायकारी राजवट या देशातल्या जनतेने मोडली आहे. मुख्यमंत्री मराठा समाजासोबत दोषाच्या भावनांनी वागतंय. आज प्रजासत्ताकदिन आहे, याच प्रजेच्या विरोधात आज सरकार वागत असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. आम्हाला न्याय पाहिजे. अन्याय अत्याचार करणारं सरकार आहे, असंच वाटतंय. आता आम्ही फक्त आरक्षणासाठी संघर्ष करत आहोत. आम्ही सरकारला आरक्षण मागतोय,कुणाचाही बळी मागत नाही.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांविषयी द्वेष भावना निर्माण करू नये. मराठ्यांच्या लेकरांविषयी पोटात विष भरलंय. खरं काय, ते या आंदोलनाच्या माध्यमातून पूर्णपणे बाहेर येईल असं जरांगे यांनी म्हटलंय. वाल्मिक कराडवर बोलताना मनोज जरांगे यांनी आरोपीला व्हिआयपी ट्रिटमेंट का दिली जाते? जर आरोपीला काहीच झालं नव्हतं, तर एडमिट कशाला केलं होतं, असा सवाल विचारला आहे.
सगळया आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करा. सरकारी डॉक्टरची देखील चौकशी करा. प्रकाश आबिटकर यांना विनंती आहे, डॉक्टर त्याच दुखत नसताना दुखत असल्याचं सांगतायत. त्यांची चौकशी करा. त्याच दुखत नसताना त्याला दवाखान्यात का ठेवलं? वाल्मीकला गुन्ह्यातून सोडण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांनी षडयंत्र केलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
वाल्मिक कराडला काहीही झालेलं नाही. सत्तेचा वापर करून अधिकारी पाठवले जात आहे. दवाखान्यात नेऊन सोडण्याचं ऑपरेशन सुरू आहे. आता सरकारने एक काम करावे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, त्याच्या ड्रायव्हरचे सीडीआर काढा. तो दुसऱ्यांच्या फोनवरून बोलतो, असा आरोप त्यांनी केला आहे.जर हे आरोपी सुटले, तर याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.