अहमदनगर

पाथर्डीत मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारत केले निषेध आंदोलन !

पाथर्डी प्रतिनिधी:-

खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार व शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरणाऱ्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा . जिल्ह्यातही विविध ठिकाणी आंदोलने होत असताना पाथर्डीत निषेध आंदोलन करण्यात आले.

आज सकाळी महाविकास आघाडी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी शहरातील नाईक चौकात ठिय्या मांडत मंत्री सत्तार व पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारत या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आंदोलन केले.


यावेळी झालेल्या निषेध सभेत महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री सत्तार व पाटील यांचा व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या कामकाजाचा खरपूस समाचार घेत या दोन्ही मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी केली.

कार्यकर्त्यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे ही यावेळी दहन केले.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शहराध्यक्ष योगेश रासने, देवा पवार, महारुद्र कीर्तने, पांडुरंग शिरसाट, सिताराम बोरुडे, हुमायून आतार, ज्येष्ठ नेते लक्ष्मण डोमकावळे, माजी नगरसेवक चांद मणियार, राष्ट्रवादी युवती आघाडीप्रमुख ज्योती जेधे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, युवा सेनेचे सचिन नागापुरे, नवनाथराव चव्हाण, शहर संघटक संतोष मेघुंडे, भाऊसाहेब धस, काँग्रेसचे जुनेद पठाण, जालिंदर काटे, आनंद सानप, अजय पाठक, महेश दौंड, अतिश निराळी, आक्रम आतार, एम पी आव्हाड, उबेद आतार, आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


महाराष्ट्राच्या पुरोगामी व सुसंस्कृत राजकारणाला या शिंदे फडणवीस सरकारमधील या मंत्र्यांनी हरताळ फासला. जनतेची कामे करण्याऐवजी बेताल वक्तव्य करून हे मंत्री प्रसिद्धी मिळवत आहेत. महिलांविषयी, माता भगिनींविषयी अशा भाषेत वक्तव्य करणे हे यांना शोभा देणारे नाही. या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व या पुढील काळात या मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही. सत्तार याचा मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घ्यावा.


शिवशंकर राजळे
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button