पारनेरमध्ये शेतकरी महिला ग्रुपचे वतीने नवरात्र उत्सव साजरा.

पारनेर दि.१० पारनेर प्रतिनिधी
पारनेर शहरातील मगर वस्ती येथील शेतकरी महिला ग्रुपचे वतीने नवरात्र उत्सव मोठया आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसेंदिवस आधुनिक आणि पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणात सण उत्सवात महाराष्ट्रातील मातीतील संस्कृती लोप पावत चालली आहे. आताच्या नव तरुणींना गरबा, दांडीया तसेच पारंपरिक सण उत्सवाना अनुसरून असणारी गाणी पहावयास किंवा एकावयास मिळत नाही. याच अनुषंगाने पारनेर शहरातील मगर वस्ती येथील मनीषा मगर व कविता मगर या शेतकरी नव तरुणींनीच्या संकल्पनेतून शेतकरी महिला ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रूप चे माध्यमातुन मगर वस्ती येथील सर्व शेतकरी महिला एकत्र येऊन सर्व हिंदु सण आनंदात साजरे करतात. त्याचं प्रमाणे नवरात्र उत्सव मोठया आनंदात साजरा केला.
यावेळी रोज संध्याकाळी शेतकरी महिलांनी गरबा व दांडीया खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी शेतकरी महिला ग्रुपचे सदस्य मनीषा मगर, कविता मगर, मिरा पुजारी, पौर्णिमा औटी, सुषमा औटी, रंजना लोंढे, रुपाली औटी, रोहिणी औटी, जया औटी, वैशाली औटी, नेहा औटी, प्रियंका औटी, सुनीता औटी, वैशाली औटी, अश्विनी औटी, मंगल मगर, अनिता मगर, सुप्रिया मगर, कविता मगर, शारदा मगर, विजया औटी, संगीता औटी, आदींसह मगर वस्ती येथील ज्येष्ठ शेतकरी महिला व चिमुकले उपास्थित होते.