डाॕ.डी.वाय.पाटील महाविद्यालयाचे विद्यापीठस्तरीय गिर्यारोहण शिबिर’ रतनगड येथे संपन्न

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी ः
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी तसेच डाॕ. डी. वाय. पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे रतनवाडी, कळसूबाई-हरिश्चंद्रगड-अभयारण्य येथे विद्यापीठस्तरीय लोककला कार्यशाळा व गिर्यारोहण शिबिर’ पार पाडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व प्राचार्य डाॕ. मोहन वामन हे 1997 पासून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनवाडी या गावात गिर्यारोहण शिबिर घेत आहेत. या शिबिरात पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्हयातून 230 विद्यार्थ्यांनी व १२ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवीला. या शिबिरात सर्व विद्यार्थ्यांनी रतनगडचे ट्रेकिंग केले. सर्व विद्यार्थ्यांना रॅपलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच रतनगडावर जंगलातून गडावर जाणाऱ्या मार्गाची स्वच्छता करण्यात आली. शिबिरार्थींसाठी विविध विषयावर तज्ज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आदिवासी भागातील लोकसंस्कृतीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात या भागातील महिला भगिनींनी आणि पुरुष मंडळींनी जोहार, सण उत्सवाची गाणी, लग्नाची गाणी, हळदीची गाणी, देवांची आराधना करणारे गाणी, भात पिकाची लावणी करताना म्हटली जाणारी गाणी अशी अनेक गाणी विद्यार्थ्यांना गाऊन दाखवली. रतनवाडी गावातील देवराईत विद्यार्थ्याना नेऊन त्या ठिकाणी प्रा. सुभाष वर्पे यांनी देवराईबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

प्रारंभी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बी. एस. टी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, प्रेरणादायी वक्ते . विक्रम भोयर , प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. जयराम डेरे, प्रा. गणेश थोरात, रतनवाडी गावच्या सरपंच सौ. धनश्री झडे, या प्रसंगी डॉ. वाघ यांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी अशी शिबिरे फार महत्वाची असतात असे मत मांडले तर व डॉ.घायवट यांनी सावित्रीबाई फुले, बाबा आमटे आणि संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून देऊन त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी अशाच सामाजिक कार्यासाठी या योजनेत सहभागी होत असतो असे मत मांडले. तर श्री. भोयर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी आपले सर्व लक्ष आपल्या ध्येयाकडे केंद्रित करावं असे मत मांडले. तत्पूर्वी प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी या समारंभाचे प्रास्ताविक करताना या शिबिराचा उद्देश सांगितला आणि या भागात शिबिर घेत असताना गेल्या 28 वर्षांमध्ये आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रतनवाडी गावचे माजी सरपंच श्री. दगडू पांढरे पाटील, प्रा. सुभाष वर्पे हे उपस्थित होते. या प्रसंगी श्री. पांढरे पाटील यांनी मार्गदर्शन करताना आपल्या गावात होत असलेल्या शिबिराविषयी आनंद व्यक्त केला. यावेळी अनेक विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रा. संतोषी साळुंखे, प्रा. शालिनी यादव, प्रा. सतीश ठाकर, प्रा. अभिषेक पोखरकर यांनी ही या कार्यशाळा व शिबिरातील अनुभव मांडले. कार्यक्रमात अध्यक्ष मार्गदर्शनामध्ये प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी विद्यार्थ्यांना आपल्या पारंपारिक लोकसंस्कृतीची माहिती व्हावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये साहस निर्माण व्हावे या उद्देशाने या कार्यशाळेचे व शिबिराचे आयोजन केले असे मत त्यांनी व्यक्त केले. या नंतर विद्यार्थी विकास अधिकारी डाॕ. मुकेश तिवारी यांनी आभार मानले.
या कार्यशाळेचे व शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील सर, उपाध्यक्ष मा. डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील, खजिनदार डाॕ. रोहिणी पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजनेचे, संचालक डाॕ. सदानंद भोसले आणि प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या नियोजनात विद्यार्थी विकास अधिकारी डाॕ. मुकेश तिवारी, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. खालीद शेख, डॉ.मीनल भोसले , प्रा.भागवत देशमुख, प्रा. रोहित वरवडकर,, प्रा. संतोषी साळुंखे, प्रा. आकाश शिर्के, प्रा. अभिषेक पोखरकर, प्रा. मयुर मुरकुटे, प्रा. सतिश ठाकर, प्रा. राहुल थोरात, प्रा. शालिनी यादव, प्रा. संदीप वर्धे, प्रा. शुभांगी कुंभार, प्रा. शुभांगी पाटील, प्रा.शुभम मुर्तडक, श्री. गणेश कोळी श्री. अक्षय राक्षे यांनी सहभाग घेतला.
या शिबिरासाठी रतवाडी ग्रामस्थ तसेच श्री. नाथा झडे व दशरथ झडे यांचे सहकार्य लाभले.