नाशिक येथे सुवर्णकार महिला मंडळ यांचे कडून हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा

नाशिक प्रतिनिधी /डॉ. शाम जाधव
बालाजी कोट नासिक येथे संपूर्ण सुवर्णकार महिला मंडळ यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला
त्यासाठी सर्व महिलांनी उपस्थिती दर्शविली त्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सुवर्णकार महिला मंडळ अध्यक्षा सौ.मंजुषाताई कुलथे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अँड सौ विनया नागरे,सौ सोनम कपिले,सौ अंकिता आंबेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले

त्यासाठी सौ. पूजा नागरे, सौ श्रद्धा नागरे, नमिता आडगावकर, हेमा लोळगे सविता शहाणे तसेच अनेक महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्या ठिकाणी योगा टीचर सौ.कविता कुलथे यांना सन्मानित करण्यात आले होते कविता कुलथे महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी व त्यासाठी योगा करावा त्याबद्दल मार्गदर्शन केले तसेच अनेक विविध खेळाच्या माध्यमातून कार्यक्रमांमध्ये वातावरण निर्मिती झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.सौ विनया नागरे, सोनम कपिले, अंकिता आंबेकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रतिमापूजन सौ पूजा नागरे, सचिव महिला मंडळ. तसेच खजिनदार नमिता काजळे, रंजना महालकर यांच्या हस्ते करण्यात आले. वैशाली जवळकर, विद्या शहाणे, यांनी उखाणे घेऊन कार्यक्रमाचे रंगत वाढविले. अंताक्षरी , विविध खेळ व उखाणे अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपूर्ण कार्यक्रम पार पडलात तसेच सीमा आंबेकर, पोर्णिमा आडगावकर, शितल शहाणे, गौरी दहिवळकर, विजया कुलथे, ज्योती चित्तम, प्रतिभा सोनार, प्रतिभा नागरे, जानवी मंडलिक, छाया जुन्नरकर, वर्षा डहाळे, प्रियंका सोनारकर, वंदना माळवे, वैष्णवी जवळकर, रोहित शहाणे, स्वप्नाली आडगावकर, प्रतिभा मालवी, अमृता मालवी, राजश्री नागरे महिलांनी या कार्यक्रमाची उपस्थिती दर्शविले त्यांच्या साठी संपूर्ण सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.