मेहता महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सम्पन्न

: (संजय महाजन)
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालय व्हीपीएस प्राथमिक मराठी आणि इंग्रजी मीडियम विभाग यांच्या एकत्रित सहभागाने 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
76 व्या प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान यावर्षी प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर आणि ज्येष्ठ शिक्षक श्री. चंद्रकांत जोशी यांना मिळाला. कार्यक्रमानिमित्त श्री. भगवानभाऊ आंबेकर, श्री. राजेशजी मेहता, श्री. उदय महिंद्रकर आणि श्री. चंद्रकांत जोशी यांनी आपले मनोगत सादर केले. त्यांनी आपल्या मनोगता मधून देशसेवा, समाजसेवा आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य अॅड. संदीप अगरवाल, शाळा समिती सदस्य श्री. धीरूभाई कल्याणजी यांनी शिक्षक, सेवक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती वैशाली तारू तर सूत्रसंचालन श्री. संजय पालवे यांनी केले. राष्ट्रगीत, राज्यगीत आणि झेंडागीत गायन संस्कृती विभाग प्रमुख श्री. धनंजय काळे आणि विद्यार्थ्यांनी सादर केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. धनंजय काळे, श्री. योगेश कोठावदे सांस्कृतिक विभाग, श्री. भीमराव राऊत, श्री. संजय राऊत, श्री. ज्ञानेश्वर बुरांडे शारीरिक शिक्षण विभाग, सर्व शिक्षक आणि सेवक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमानिमित्त हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, मराठी प्राथमिक, इंग्रजी प्राथमिक विभाग आणि मॉन्टेसरी विभागातील सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सुंदर कार्यक्रम बसवले. त्यामध्ये शिवगर्जना, लाठी-काठी, मनोरे, स्काऊट गाईड बँड पथक, स्काऊट आणि गाईड परेड, देशभक्तीपर नृत्य, देशभक्तीपर गाणी, समूहगीत, विद्यार्थी मनोगत आणि लेझीम यांचा समावेश होता.
कार्यक्रमासाठी शाला समिती अध्यक्ष तथा नियामक मंडळ सदस्य श्री. भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री. राजेशजी मेहता, प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, प्राथमिक मराठी विभाग मुख्याध्यापिका श्रीमती मंगल जाधव, इंग्रजी प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका श्रीमती भारती लोखंडे, बीसीएस सीनियर कॉलेजचे प्राचार्य श्री. चंद्रशेखर भगत, व्हीपीएस इंग्लिश मॉन्टेसरीच्या मुख्याध्यापिका श्रीमती अन्नपूर्णा सूर्यवंशी, ज्येष्ठ शिक्षक श्री. चंद्रकांत जोशी, वरिष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, संगणक विभागाच्या प्रमुख सविता सिंग उपस्थित होते.