तर राज्यात माजी सैनिकांचे सरकार आणा सैनिकांच्या अधिवेशनातील सूर

शिर्डी दि ७
शिर्डी त मध्ये महाराष्ट्रातील सर्व संघटनाना निमंत्रण देऊन सैनिक फेडरेशनने अधिवेशन आयोजित केले होते ते खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले राजकारणात माजी सैनिकाला जागा आरक्षित असावी अशी मागणी करत तर माजी सैनिकांचे सरकार आणावे असा सूर अधिवेशनात व्यक्त करण्यात आला
त्रिदल चे अशोक चौधरी मेजर (सर) यांनी या शिर्डी अधिवेशनात जो राजकिय पक्ष सैनिकाला ग्रामपंचायत ते मंत्रालय पर्यंत एक जागा आरक्षीत करील व एका जागेवर तिकीट देऊन निवडुन आणेल त्या राजकीय पक्षाला १०० टक्के सैनिपरिवाराचा महाराष्ट्रात पाठींबा राहील असे जाहीर केले यावेळी सर्व उपस्थित माजी सैनिक परिवाराने मोठ्या टाळ्यांच्या गजरात पाठींबा दिला तसेच जो पक्ष सैनिक परिवारास तिकीट देणार नाही व विरोध करेल त्या राज्य पक्षाच्या सरपंच, नगर पालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था) तसेच विधानसभा, लोकसभा अशा निवडनिकांत विरोधात सर्व संघटना पुर्ण महाराष्टभर एकजुटीने उभे राहण्याची घोषणा केली
यामुळे प्रत्येक पक्ष सैनिक परिवारास विचारात घेईल ही बाब मेजर चौधरी यांनी समोर आणली. सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष श्री नारायण अंकुश यानी तर “जय जवान जय किसान” नावाच्या ब्रँड देऊन महाराष्ट्रात “सैनिकांच सरकार” आणण्यासाठी पुढे आले पाहिजे असे सांगितले डी एफ लिंबाळकर व सैनिक फेडरेशनचे आयोजक टिमचे अभार मानले. या अधिवेशनात ब्रिगेडीयर सावंत व महाराष्ट्रातील सर्व संघटनेचे पदाधिकारी ऊपस्थित होते.
——–
