सुभेदार रामजीबाबा सकपाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त सांगलीत अभिवादन

सांगली -सुभेदार मालोजी (रामजीबाबा) सकपाळ यांच्या ११२ व्या स्मृती दिनानिमित्त सांगली येथील माता रमाई डॉ.आंबेडकर उद्यानामध्ये त्यांच्या प्रतिमेस धूप, दिप आणि पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
माजी नगर सदस्य जगन्नाथ दादा ठोकळे यांनी रामजी बाबा यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८४८रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला, आणि त्यांचा मृत्यू दोन फेब्रुवारी १९१३रोजी मुंबई येथे झाला ते भारतीय सैनिक दला दलामध्ये शिक्षक होते. ते सुभेदार पदापर्यंत सैन्यांमध्ये कार्यरत सेवा केली. ते कबीरपंथी असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनावर संत कबीरांचा विचाराचा प्रभाव चांगलाच पडलेला होता, अशा या शूरवीरास भावपूर्ण आदरांजली त्यांनी वाहिली.
आयु. चंद्रकांत चौधरी यांनी रामजी बाबा हे इंग्रजी सैन्यामध्ये सुभेदार या पदावर कार्यरत असल्यामुळे त्यांचा इंग्रजी भाषेवर प्रभाव होता. त्यांनी भारतीय सैन्यांना शिकविण्याचे शिक्षक म्हणूनही काम केलेले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ते वडील होते, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण देण्यासाठी खूप हाल अपेष्टा झाल्या.
ज्येष्ठ नागरिक बोधिसत्व धम्मरत्न भोरकडे (मामा) व आप्पासाहेब साबळे मामा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, महानगरपालिकेचे माजी उपायुक्त चंद्रकांत चौधरी,बापूसाहेब ठोकळे,सचिन ऐवळे,अजय उबाळे,जगन्नाथ आठवले,गणपती चवडीकर, प्रभाकर कांबळे,जगदीश पाटील, बबन बनसोडे,सुशांत कांबळे,लखन नागराळे,बप्पू केंगार यांचेसह अन्य मान्यवरांनी अभिवादन केले., आणि कार्यक्रमाची सांगता झाली.