इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२२/०९/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ३१ शके १९४४
दिनांक :- २२/०९/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२५,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति २५:१८,
नक्षत्र :- आश्लेषा समाप्ति २६:०३,
योग :- शिव समाप्ति ०९:४४,
करण :- कौलव समाप्ति १२:३०,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – उत्तरा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०१:५२ ते ०३:२३ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:१९ ते ०७:५० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२२ ते ०१:५२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:५२ ते ०३:२३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:५४ ते ०६:२५ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
व्दादशी श्राद्ध, संन्यासिनां महालय,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ३१ शके १९४४
दिनांक = २२/०९/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
आत्मविश्वास बाळगून काम करा. नातेवाईकांशी व्यवहाराने वागा. आज दिनक्रम व्यस्त राहील. मनाचा तोल सांभाळावा. समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल.

वृषभ
इतरांकडून स्तुति केली जाईल. सतत काम करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा. ग्रहमानाची साथ मिळेल. आजचा दिवस शुभ राहील. धनसंचय वाढीस लागेल.

मिथुन
वागणे आणि बोलणे यांचा मेळ साधावा. दिवस धावपळीत जाईल. मात्र नियोजित काम पूर्ण होईल असे नाही. प्रवास संभवतो. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

कर्क
विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. घरातील कामात अडकून पडाल. रचनात्मक कामात आनंद मिळेल. व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत होईल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल.

सिंह
आपल्या चांगुलपणाला तडा जाऊ देऊ नका. मनातील इच्छेला अधिक महत्व द्यावे. कार्यक्षेत्रात उत्तम कामकाज कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. प्रामाणिकपणे काम करण्यावर भर द्याल.

कन्या
आळस बाजूला सारावा लागेल. आपल्यातील कला जोपासा. कामाचा अधिक ताण जाणवेल. धार्मिक गोष्टीत मन रमेल. वादाचे प्रसंग टाळावेत.

तूळ
हातातील काम मनापासून करावे. कामातून चांगले समाधान मिळेल. आपण घेत असलेल्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल. मित्राचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृश्चिक
आहारातील पथ्य पाळा. अंत:करणापासून समोरच्याला मदत करा. प्रेम संबंधातील ओलावा वाढेल. नातेवाईक मदतीला येतील. जुने मित्र बरेच दिवसांनी भेटण्याचा योग.

धनू
आज आखलेले काम सुरळीत पार पडेल. जास्त काळजी करू नये. स्पर्धा परीक्षेसंदर्भात सकारात्मक वार्ता मिळेल. मित्राने दिलेली शुभ वार्ता मन प्रसन्न करेल. समस्येचे निराकरण होईल.

मकर
उगाचच कोणाची खोडी काढू नका. कामाचा व्याप वाढता राहील. जवळचा प्रवास करावा लागेल. कामाच्या बाबतीत गाफिल राहू नका. विस्कळीत कामाची घडी नीट बसवावी.

कुंभ
फसव्या लोकांपासून सावध रहा. स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्या. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. मित्राची योग्य साथ लाभेल. विरोधक पराभूत होतील.

मीन
व्यावसायिक प्रगती साधता येईल. मनोकामना पूर्ण करणारा दिवस. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. धार्मिक कामातील गोडी वाढेल. कुटुंबासाठी देखील वेळ काढावा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button