मुलांनी वाचन आणि लिखाणावर भर द्यायला हवा – कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे

नाशिक : आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांनी वाचन संस्कृती जोपासण्याची आवश्यकता आहे. निरनिराळ्या विषयांची पुस्तके वाचतानाच लिखाण करण्यावरही भर द्यायला हवा. ज्ञानाची शिदोरी अंगी करताना जीवनात आपल्याला काय व्हायचे आणि काय करायचे याचे ध्येय निश्चित करायला पाहिजे असे मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी व्यक्त केले. विनायक रानडे ह्यानी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माणसाने आपला निसर्ग वाचला पाहिजे आणि जीवनात यश मिळवायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही असे मोलाचे मार्गदर्शन केले.
ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठात दोन दिवसीय ‘रायला’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन सत्रात व्यासपीठावर ग्रंथ तुमच्या दारी प्रकल्पाचे विनायक रानडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत, सचिव शिल्पा पारख, प्रकल्प सचिव हेमराज राजपूत, रायला चेअरमन राज तलरेजा आदी उपस्थित होते. बुद्धीप्रेरक खेळ, ध्यानयोग, क्रीडा मार्गदर्शन, दृक श्राव्य स्टुडिओ, कृषि प्रक्षेत्र भेट, प्रेरणादायी व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी रविवारी ‘रायला महोत्सव २०२५’ चा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर पोहोचू शकतो याचा आत्मविश्वास मुलांना रायलातून त्याचा नक्की फायदा होईल असे प्रतिपादन असि. गवर्नर ओंकार महाले यांनी केले .

यावेळी सर्वोत्कृष्ट रायला अवार्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यात शासकीय आदिवासी आश्रमशाळा वाघेरा आणि धोंडेगावच्या मुलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी. रायला महोत्सवात एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात उद्योगवर्धिनीचे संचालक सुनील चांडक, हेमराज राजपूत, डॉ. संतोष साबळे, डॉ. नागेश मदनुरकर, डॉ सोनाली चिंधडे, मकरंद चिंधडे, राजेश्वरी बालाजीवले, मोना गुलाटी, सौ. दिपाली खेडकर, इस्कॉनचे स्वामी कृष्णा धनदास, योगेश चव्हाण, पराग जोशी आदींनी विविध विषयावर मुलांशी संवाद साधला.
प्रारंभी अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डॉ संतोष साबळे व निलेश सोनजे यांनी परिचय करून दिला. हेमराज राजपूत यांनी आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर गवळी, प्रदीप कोठावदे, राज यादव, मनिष चिंधडे, डॉ गौरव सामनेरकर रवि महादेवकर, उर्मी दिनानी, मकरंद चिंधडे, विजय दिनानी, अमित पगारे, रोहित देशपांडे, वैशाली रावत,सुधीर वाघ, संदीप दळवी आदींचे सहकार्य लाभले. प्रकल्प सचिव हेमराज राजपूत यांनी आभार मानले उद्धाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता अपशंकर व रोहित देशपांडे व समारोप सत्राचे सूत्रसंचालन , सुरेखा राजपूत आणि वैशाली चौधरी यांनी केले
अविनाश शिरोडे ह्यानी विद्यार्थ्यांना तारांगण येथे खगोलशास्त्र विषयी माहिती दिली त्यासाठी शिवानी तलरेजा,मोनिका पगारे ,मोना सामनेरकर ह्यानी विशेष नियोजन केले.