माता रमाबाई आंबेडकर जयंती निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिर

प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
आज दिनांक ७/२/२०२५ रोजी माता रमाई यांची १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली या निमित्त आगासखिड येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
आयोजक श्री संतोष विलास जगताप श्री सुनिल नामदेव जगताप माजी सरपंच श्री दतू भाऊ आरोटे सोसायटी चेरमन श्री अशोक भाऊ जाधव माजी संचालक श्री बाळासाहेब बरकले माजी सरपंच श्री मधुकर लांहगे सरपंच सौ ज्योती ताई लाहगे सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील नामदेव जगताप आयोजकांनी नामांकित डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये नेत्र तपासणी, बीपी तपासणी, शुगर तपासणी, वजन तपासणी, उंची तपासणी व नियमित आहार कसा संकलन कराव याची मार्गदर्शन सुद्धा डॉ प्राजक्ता जठार मॅडम यांचे हे या ठिकाणी मार्गदर्शन लाभले
डॉ . प्राजक्ता जठार डॉ . हर्षदा तळेगावकर श्री . सिद्धार्थ गोरे
श्री . रवी कुलकर्णी ह्या सर्व टीमने माता रमाई यांचे वंदन करून आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी सुरू केली ह्या तपासणीसाठी उत्तम असा प्रतिसाद मिळाला असून सर्व गावातील वृद्ध महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते

गावचे सरपंच व पदाधिकारी यांनी असे ग्वाही केली की कुठलेही सामाजिक कार्यास आमचा सहभाग राहील कुठेही कमी पडून देणार नाही सदरील कार्यक्रमाचे आगासखिंड धम्मरत्न मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले आलेल्या सर्व पाहुण्यांचे आयोजकांनी आभार मानून त्यांची सत्कार केले हा कार्यक्रम अगदी आनंदी व प्रसन्न वातावरणात पार पडला