धुरपते-सरडे यांनी पारनेर चे नाव केले उज्वल : सभापती काशिनाथ दाते सर

दत्ता ठुबे /पारनेरप्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील जामगाव येथील अमोल मोहन धुरपते व देवी भोयरे येथील अमोल बाळासाहेब सरडे यांनी एम पी एस सी परीक्षेत उज्वल यश मिळवल्याबद्दल पारनेर ग्रामीण संस्था परिवार व जामगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले अमोल धुरपते ( स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर/ असिस्टंट सेक्शन ऑफिसर) व अमोल सरडे ( स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर) यांनी मिळवलेले यश उत्तुंग आणि कौतुकास्पद असून पारनेर तालुक्याला अभिमानास्पद आहे. तसेच ज्या तरुणांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आहे त्यांनाही या यशाद्वारे प्रेरणा निश्चित मिळणार आहे. तसेच प्रदीप मोहन धुरपते यांची मुंबई पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला प्रदीप धुरपते आणि अमोल धुरपते हे सख्खे भाऊ आहेत.
सरडे यांचे मूळ गाव देवी भोयरे असून लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. आपल्या आजोळी मामाकडे भाळवणी येथे येऊन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. रेसिडेन्सिअल कॉलेज अहमदनगर येथून १२ सायन्स उत्तीर्ण होऊन, सिंहगड कॉलेज लोणावळा येथे बी.ई मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. २०१६ ला महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षेची तयारी सुरू केली व २०१८ ला जी.एस.टी विभागात पुणे येथे “कर सहाय्यक” म्हणून नियुक्ती झाली. नोकरी काळातही अभ्यास सुरू ठेवून २०२१ ला झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत “स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर” म्हणून यश संपादन केले. या यशाचे सर्व श्रेय त्यांनी आपले मामा बाबासाहेब व नितीन रोहोकले सर यांना दिले आहे. तसेच अमोल धुरपते यांचे प्राथमिक शिक्षण जामगाव येथे झाले असून माध्यमिक शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल पारनेर येथे झाले. पुढे बी.ई मेकॅनिकल अवसरी, पुणे येथे पूर्ण करून राज्य लोकसेवा आयोगाचा अभ्यास करून पी.एस.आय ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही तीन वर्षे घरी अभ्यास करून २०२१ ला झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत “स्टेट टॅक्स इनस्पेक्टर” म्हणून यश संपादन केले त्यांचे आई वडील शेती करतात.

यावेळी माजी चेअरमन बाळासाहेब सोबले, नाथू मामा बांगर, एकनाथ धुरपते, मंच्छिद्र शिंदे , सिताराम खोडाळ, सोसा. संचालक त्रिंबक पवार , उल्हास मांढरे, बबन धुरपते सर , व्हा चेअरमन शिवाजी नाईक, विष्णु नाईक , मा. सरपंच बबन पवार, बाबासाहेब रोहोकले, नितीन रोहोकले सर, विठ्ठल सोबले ,दत्ता बांगर , आबाजी बांगर ,बटु सोबले ,पांडूरंग सोबले, सागर ढवळे , संदिप सोबले ,पिनु नायकोडी, सौ सविता मोहन धुरपते, मोहन धुरपते, अमोल सरडे यांचे मामा बाबासाहेब रोहोकले व नितीन रोहोकले सर उपस्थितीत होते.
त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल राज्याच्या विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी,शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.