इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य ,दि. ०८/०२/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ १९ शके १९४६
दिनांक :- ०८/०२/२०२५,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२६,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति २०:१६,
नक्षत्र :- मृग समाप्ति १८:०७,
योग :- वैधृति समाप्ति १४:०४,
करण :- वणिज समाप्ति ०८:४९,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- मकर – धनिष्ठा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वैधृति वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:५२ ते ११:१८ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:२७ ते ०९:५२ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०९ ते ०३:३५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३५ ते ०५:०० पर्यंत,

❀ दिन विशेष:
जया एकादशी, घबाड २०:१६ नं., भद्रा ०८:४९ नं. २०:१६ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ १९ शके १९४६
दिनांक = ०८/०२/२०२५
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. क्षणिक गोष्टीने खट्टू होऊ नका. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल.

वृषभ
मौल्यवान वस्तु खरेदी कराल. घरातील कामात रमून जाल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. मनातील गैरसमज बाजूला ठेवावेत. विचारांची दिशा बदलून पहावी.

मिथुन
क्षुल्लक कारणावरून होणारे मतभेद टाळावेत. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. उष्णतेचा त्रास जाणवेल. आरोग्याबाबत हयगय करू नका.

कर्क
अपचनाचा त्रास जाणवू शकतो. हातातील कामात यश येईल. उगाचच कोणाशीही वादात अडकू नका. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. मनातील अनामिक भीती बाजूला सारावी.

सिंह
खेळात अधिक वेळ घालवाल. मुलांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. भागीदारीचा लाभ उठवावा. पोटाची काळजी घ्यावी लागेल.

कन्या
कौटुंबिक कामात गुंतून राहाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे. नवीन वाहन खरेदीचा विचार मनात डोकावून जाईल. जोडीदाराची उत्तम साथ राहील.

तूळ
जवळचा प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरावेत. हितशत्रूंचा त्रास कमी होईल. कामाचे समाधान लाभेल.

वृश्चिक
मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे. कामाची व्याप्ती वाढवता येईल. बोलतांना भान राखावे.

धनू
तुमची छाप पाडण्याचा प्रयत्न कराल. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड करू नका. कौटुंबिक काळजी सतावत राहील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.

मकर
शांत व संयमी भूमिका घ्याल. जबाबदारी ओळखून वागावे. नवीन साहित्य वाचनात येईल. जमिनीच्या व्यवहारातून लाभ होईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

कुंभ
कामाचा ताण राहील. गप्पांची हौस पूर्ण करता येईल. चौकसपणा दाखवावा लागेल. आपले विचार उत्तमरीत्या मांडण्याचा प्रयत्न करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल.

मीन
झोपेची तक्रार जाणवेल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कागदपत्रे नीट तपासून पहावीत. प्रलोभनापासून दूर राहावे. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button