नाशिक मध्ये वात्सल्य वृद्धाश्रमाचा १३ वा वर्धापन सोहळा साजरा

नाशिक प्रतिनिधी/ डॉ.श्याम जाधव
नाशिक -आज दिनांक२७/१२/२०२४ रोजी वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी या ठिकाणी वृद्धाश्रमाचा वर्धापन दिवस संपन्न झाला. १३ वर्ष पूर्ण होऊन १४ व्या वर्षात पदार्पण झाल्याने आश्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
यामध्ये चिक्की सर यांचे सायक्लोन डान्स अकॅडमी, शिवपूजा डान्स अकॅडमी, प्रिया लाईफस्टाईल अकॅडमी, नंदकिशोर शेवाळे सर यांच्या चिमुकल्यांचा फॅशन शो आणि नाशिक मधलं सुपरहिट सूत्रसंचालन करणारे संतोष फसाटे आणि त्यांचे गायक वृंद या सर्व माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने सादरीकरण करून आजी-आजोबांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.

विशेष म्हणजे यामध्ये स्पॉन्सरशिप सोनी पैठणी वाले यांच्याकडून आजी आजोबांना उत्तम नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्याच पद्धतीने सोनी बंधूंनी यावेळी बासरी वाजण्याचा देखील कार्यक्रम यावेळी केला. आणि सगळ्यांची मन जिंकून घेतली. यावेळी सर्वच अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान असं नृत्य करून वातावरण आनंदमय केलं होतं.
या कार्यक्रमासाठी विशेष आकर्षण आणि उपस्थिती होती ती म्हणजे सोनी मराठीवरील हास्य जत्रातील कॉमेडियन शाम राजपूत यांची. त्याचप्रमाणे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे, कारगिल योध्दा श्री दीपचंद नायक, श्री गुरुनानी सर, श्री अग्रवाल सर, उद्योजक श्री पुनित प्रभूदेसाई, सौ ललित राका सर,सह्याद्री सेवा सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्री सचिन खोडे, श्री प्रणव सातभाई,श्री दीपक बैचे सर,श्री चंद्रकांत पाटकर श्री विवेक परदेशी सर,नगरसेविका सौ जयश्री सोनवणे, श्री अनिल खालकर, डॉ संतोष घेगडमल, सौ मोना दीदी, श्री संजय सोनी पैठणीचे संचालक, मुलाखतकार, निवेदकश्री सुरेश चव्हाण, सौ अदिती गायकवाड, सौ धनश्री शेळके, ॲडव्होकेट एकता कदम,रूपा पाटील , डॉक्टर चेतना सेवक, सौ कीर्ती जाधव अशा विविध मान्यवरांनी हजेरी लावत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी सर्वच मान्यवरांनी वात्सल वृद्धाश्रमाबद्दल आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आश्रमासाठी येथायोग्य आपल्याला जे योगदान देता येईल ते निश्चित द्यावे असे देखील आवाहन केले. यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री सतीश सोनार व सौ सोनार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले त्याचप्रमाणे कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ज्या कलाकारांनी आपलं सादरीकरण केलं त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित देखील करण्यात आले. हा संपूर्ण मनोरंजनाचा कार्यक्रम वात्सल्य वृद्धाश्रमामध्ये सर्व हितचिंतक, देणगीदार, स्पॉन्सर्स यांच्या मदतीने शक्य झाला आणि असंच सहकार्य आणि लवकरच नवीन वास्तूत आम्ही राहण्यासाठी जावो अशी अपेक्षा यावेळी या वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी सर्वांसमक्ष व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी वृद्धाश्रमातील श्री योगेश पिंपळगावकर आणि संपूर्ण स्टाफ यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
