प्रा.डॉ.राजेद्र वामन यांचे पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन

संगमनेर प्रतिनिधी
येथील संगमनेर महाविद्यालयाचे योग विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.राजेंद्र वामन यांनी लिहिलेल्या 101 बिमारीया योग व प्राकृतिक चिकित्सा या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये करण्यात येणार आहे.
प्राध्यापक वामन यांनी योग विषयाच्या माध्यमातून माणसाचे विविध आजार बरे करता येतात त्या संदर्भातील माहिती देणारे पुस्तक यापूर्वी मराठीत प्रकाशित केले आहेत या पुस्तकाची हिंदी आवृत्ती दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलन प्रकाशित करण्यात येणार आहेत या पुस्तकाची अनुवाद श्रीमती ज्योती घनश्याम पाटील यांनी केला आहे. हे पुस्तक पुणे येथील चपराक प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे. दिल्ली येथे 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनातील प्रकाशन कट्ट्यावरती या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.