स्वताच्या अल्पवयीन मुली वर अत्याचार करणाऱ्या त्या नाराधमाला फाशीची शिक्षा व्हावी –

जालना. -स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या नराधम इतिहास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय विभाग जालना जिल्हा महिला अध्यक्षा सौ कांचन राजू शिरभे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे
आरोपी अनिल तुकाराम घाडगे राहणार हनुमान नगर चदना झिरा जालना याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीला त्याच्या मोबाईल फोनवरून आश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत पत्नी घरी नसताना जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला
ही घटना आईला सांगितले असे म्हणाली तर गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली अशा नराधमा विरुद्ध जिल्हा अधीक्षक साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांनी आवर्जून लक्ष घालून या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरील निवेदन अप्पर जिल्हाधिकारी जालना सौ रिता मेत्रेवार मॅडम यांना निवेदन देण्यात आले मागासवर्गीय शहर अध्यक्षा सौ अर्चना गायकवाड यांच्या समवेत सौ कांचन शिरभे यांच्या समवेत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले