कर्मयोगी सावित्रीबाई मदन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

राजुर /प्रतिनिधी
सत्य निकेतन आयोजित,दीपक पाचपुते लिखित, कर्मयोगी सावित्रीबाई मदन या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सोहळा जेष्ठ पत्रकार सुधीर लंके यांच्या शुभहस्ते झाले
अध्यक्षस्थानी सत्यनिकेतन चे अध्यक्ष ऍड एम एन देशमुख हे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी सुधीर लंके, सुभाष मदन,ऍड एम एन देशमुख, विवेक मदन, नर्गिस मदन,दीपक पाचपुते आदीसह सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. नगर जिल्ह्याचा इतिहास लिहीत असताना १९५० साली राजूर सारख्या दुर्गम आदिवासी खेड्यात सुरू झालेल्या सर्वोदय योजनेचा जिल्ह्यातील धुरीणांना विसर पडल्याची खंत व्यक्त करत स्वातंत्र्या नंतरच्या प्रतिकूल परिस्थितीत महात्मा गांधींचे विचार सर्वोदय योजना सत्यनिकेतन संस्थेच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील दीनदुबळ्या जनतेच्या मनामनात रुजविण्याचे काम सावित्रीबाई मदन यांनी सर्वोदय योजनेच्या माध्यमातून केले. संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव देशमुख म्हणाले की स्वातंत्र्या नंतरच्या दशकात कुठल्याही भौतिक सुखसोयी नसताना एका सुशिक्षित व सुखसंपन्न कुटुंबातील एक महिला दुर्गम आदिवासी भागात येते.येथील तळागाळातील लोकांच्या सेवेचे व्रत हातात घेते.

सत्यनिकेतन संस्थेच्या स्थापनेत सहभागी होते आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा करते म्हणून सावित्रीबाई मदन या खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक आहेत.त्यांच्या सेवेतून मी प्रेरित झालो
मदन कुटुंबातील सुभाष मदन,शान मदन,अर्चना मदन,सचिव टी एन कानवडे यांनीही या निमित्ताने सावित्रीबाई मदन यांच्याप्रति असलेल्या आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या.

लेखक दीपक पाचपुते यांनी हे पुस्तक कसे लिहले गेले याचा लेखाजोखा मांडला.विवेक मदन यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्तविक केले.यावेळी उपस्थित मध्ये सह सचिव मिलिंद उमराणी, मुरलीधर बारेकर डॉ प्राचार्य भाऊसाहेब देशमुख, विलास नवले, शशिकांत ओहरा नंदकिशोर बेलेकर,प्रकाश शेठ शहा,राम पन्हाळे प्रा.सुनील शिंदे, मुख्याध्यापक लहानु परबत,भाऊसाहेब मंडलिक आदी सह मोठ्या संख्येने शिक्षक व प्राध्यापक रुंद उपस्थित होते सूत्रसंचालन अध्यापक संतराम बारवकर यांनी केले, किशोर देशमुख यांनी सावित्रीबाई मदन यांच्या आवडीची वैष्णव जण तो जेणे कहीये ही प्रार्थना म्हणत आई वरील गीत सादर केले संचालक प्रकाश टाकळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
