शिर्केवाडी,मौजे.कोंडमळा येथील स्मशानभूमीचे सुशोभिकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न

चिपळूण प्रतिनिधी —
जन्म तेथे मृत्यु अटळ आहे.जीवन मग ते कोणाचेही असो,जन्मापासून ते शेवटचा श्वास घेई पर्यंत या जगात कठीण प्रसंगांना सामना प्रत्येकाला करावाच लागतो.आपल्या आयुष्याची शेवटची यात्रा ही अंतयात्रा असते.अंतयात्रेची जागा माफक सुख सोयी असाव्यात त्या अनुषंगाने देहाला अग्नी दिला जातो ती दह वाहिनी,देह ठेवण्यासाठी चौथरा,पिंडदान दशक्रीया विधी व इतर धार्मिक विधी करण्यासाठी प्रशस्त चौधरा,अंतयात्रेला आलेल्या व्यक्तींना बसण्यासाठी धर्म शाळेत बैठक व्यवस्था अशा स्मशानभूमीचे सुशोभिकरणाचे काम करण्याची संधी जनजागृती सेवा संस्थेला मिळाली याचे सर्व श्रेय संस्थेचे जेष्ठ सदस्य अरविंद सुर्वे व जनजागृती ग्रुप सदस्यांना आहे,असे संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी मनोगतामध्ये आवर्जून सांगितले.
सर्व प्रथम स्मशानभूमीत जाऊन धर्मशाळेतील भिंतीवरील लावलेल्या”लोकार्पण सोहळा”या संगलरवरी पथ्थरचे जेष्ठ समाजसेवक प्रदिप राजाराम राजेशिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण श्रीफळ वाढवून करण्यात आले.त्यानंतर कोंडमळा येथील समाजसेवक व संस्थेचे जेष्ठ सदस्य अरविंद सुर्वे यांच्या लक्ष्मी नारायण निवासस्थानाच्या भव्य प्रांगणात ‘लोकार्पण सोहळा’संपन्न झाला.याप्रसंगी समाजसेवक अरविंद सुर्वे यांच्या हस्ते मानसिंग राजेशिर्के,प्रदिप राजाराम राजेशिर्के,काॅनट्रॅक्टर संतोष राजेशिर्के यांचा संस्थेच्यावतीने शाल,श्रीफळ,संस्थेचे आभार पत्र,पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे मानसिंग राजेशिर्के यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व संस्थेने सुशोभिकरणासाठी योगदान दिल्याबद्दल आभार मानले.जेष्ठ सदस्य अरविंद सुर्वे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचा परिचय करून दिला व संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.स्मशानभूमीचे संपुर्ण काम पुर्ण झाल्यामुळे काॅनट्रॅक्टर संतोष राजेशिर्के यांना उवर्वरित रकमेचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते देण्यात आला.तसेच संस्थेचे जेष्ठ सदस्य अरविंद सुर्वे यांच्या संकल्पनेतून व विशेष सहकार्यातून स्मशानभूमीचे संपुर्ण सुशोभिकरण झाल्यामुळे त्यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसिंग राजेशिर्के यांनी केले.आभार प्रदर्शन सचिव सौ.संचिता सचिन भंडारी यांनी केले.याप्रसंगी विजय राजेशिर्के,रमेश राजाराम राजेशिर्के,रविंद्र दत्तात्रय शिर्के,राजेंद्र दत्तात्रय शिर्के,प्रकाश आत्माराम राडे, ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.शेवटी राष्ट्रगीताने व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.