इतर
सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी ने घेतले शनिदर्शन

सोनई -सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी ने रविवारी (ता.28) शनिशिंगणापुरला भेट देत शनी दर्शन घेतले उदासी महाराज मठात अभिषेक केला, चौथऱ्यावर जाऊन मूर्तीला तेल अर्पण करून दर्शन घेतले.
शनैश्वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी विश्वस्त दीपक दरंदले, माजी विश्वस्त सयाराम बानकर उपस्थित होते.
येथील दर्शनाने आत्मिक समाधान मिळत असल्याने वर्षातून एकदा दर्शनासाठी आवर्जुन येत असल्याचे सांगून शिल्पा शेट्टी यांनी पानसनाला प्रकल्प व नवीन भुयारी दर्शन खूप सुंदर निर्माण झाल्याचे सांगितले