लेबर 20 वर पुण्यात उद्या सेमिनार

पुणे दि २४ भारतीय मजदूर संघाच्या वतीने लेबर 20 वर पुण्यात सेमिनार आयोजित केले आहे
जगातील विकसनशील देशांनी एकत्र येऊन जी 20 ची स्थापना अनेक वर्षे पुर्वी केली आहे, याचे अध्यक्षस्थान भारत भूषवित आहे. भारताचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी अध्यक्षस्थानी आहेत. जी 20 अंतर्गत विविध विभागात कामकाज चालू आहे. जसे युथ 20 , वुमेन 20 , बिझनेस 20 , तसेच लेबर 20 अंतर्गत कामकाज सुरू झाले आहे. एल 20 चे अध्यक्ष स्थानी देशातील प्रथम क्रमांक ची कामगार संघटना म्हणून भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्यमय पंड्या भूषवित आहेत.
लेबर 20 च्या माध्यमातून देशातील विविध कामगार संघटना एकत्रित येवुन कामगारांना विविध विषयांवर , प्रशांबाबतीत जनजागृती करणे, समान विषयांवर ऐकमत करून याचा मसुदा च्या प्रस्ताव जी 20 समोर सादर करण्यात येणार आहे. या निमित्ताने भारतीय विविध शहरात, औद्योगिक परिसरात ऐल 20 च्या सेमिनार चे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने दि 25 मे 2023 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐल 20 च्या सेमिनार चे नियोजन मराठा चेंबर्स आॅफ काॅमर्स टिळक रोड येथील हाॅल मध्ये करण्यात आले आहे. या सेमिनार चे उदघाटन मा दीपक करंदीकर चेअरमन मराठा चेंबर्स आॅफ काॅमर्स, पुणे , मा पी एस करमासे क्षत्रीय कामगार आयुक्त ( केंद्रीय) मा अभय गीते कामगार ऊपायुक्त , यांच्या शुभ हस्ते होणार असून प्रमुख वक्ते म्हणून मा अॅड अशोक गुप्ते जेष्ठ कायदे तज्ञ ,मा स्मिता वायंगणकर सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित रहाणार असून सेमिनार चा समारोप अॅड अनिल ढुमणे अध्यक्ष भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश करणार आहेत. या वेळी विविध कामगार संघटना पदाधिकारी, व्यवस्थापन प्रतिनिधी, ऊद्योगातील प्रतिनिधी, शासकीय प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.
या सेमिनार करिता भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, हरी सोवनी, वंदना कामठे, ऊमेश विस्वाद, व ईतर पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत .
तरी या सेमिनार करिता कामगार संघटना पदाधिकारी, व्यवस्थापन पदाधिकारी, सल्लागार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने करण्यात आले आहे.