मनु मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकार भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन – सौ मेघाताई शिंपी

नाशिक. प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी मनु मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकार भुषण पुरस्कार देऊन सन्मान केले जाते.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, महिलांचे सबलीकरण ,अनाथ आश्रम ,वृद्ध आश्रम, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू पुरविणे, घरगुती कामे देणे, बचत गट तयार करून कर्ज मिळवून देणे, स्वयं रोजगार विषयी मार्गदर्शन करणे, महिलांना व्यासपीठ मिळवून देणे, कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करणे, आरोग्य शिबीर आयोजित करणे आदी सामाजिक कार्य सेवाभावी वृत्तीने करणाऱ्या मनु मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा सोमवार १७ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ सभागृह खांदवे सभागृहाच्या शेजारी पंचवटी कारंजा नाशिक येथे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार बंधु भगिनी, मनु मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या कार्यकारिणी पदाधिकारी, संस्थेचे सभासद यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती मनु मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका सौ मेघाताई राजेश शिंपी यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील “कर्तृत्ववान स्त्री-पुरुष” यांचा सन्मान सोहळा होतं आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान केला जाणार आहे अशी माहिती मनु मानसी महिला सेवाभावी संस्था संस्थापिका सौ मेघा राजेश शिंपी,सौ. कविता पाटील. ब्रँड अॅम्बेसेडर, अॅड सौ. विनया नागरे कायदेशीर सल्लागार, धनश्री गायधनी कार्याध्यक्षा, सुरेखा घोलप कार्याध्यक्षा, सौ.मिरा आवारे सह कार्य अध्यक्षा,सौ. सुनिता पाठक सह कार्यध्यक्षा, सौ विशाखा खैरनार मार्गदर्शक सल्लागार, डॉ.सौ ज्योती केदारे सांस्कृतिक अध्यक्ष, सौ.रचना चिंतावार सांस्कृतिक अध्यक्ष,सौ कविता गायके आरोग्य आणि सेवा, सौ. यमुना लिंगायत महिला संघटक अध्यक्ष,जया बुरूंगे महिला संघटक अध्यक्षा यांनी दिली आहे.