संदीप वाकचौरे यांचे पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर येथील श्री संदीप वाकचौरे यांचे चपराक प्रकाशनाचे वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या शिक्षणाचे रंग व शिक्षणावर बोलू काही या दोन पुस्तकांचे प्रकाशन दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दिली.
एकच प्रकाशक, एकच लेखक आणि एकच विषय असे एकूण बारा पुस्तके प्रकाशित करण्यात आले आहेत. या शिक्षण मालिकेतील शेवटची दोन पुस्तके दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रकाशित केली जाणार आहे. वाकचौरे यांची यापूर्वी चपरा प्रकाशाच्या वतीने दहा पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहे तर इतर प्रकाशनाची तीन पुस्तके प्रकाशित झाले आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात घडणाऱ्या घटना घडामोडींच्या आणि विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. प्रासंगिक स्वरूपामध्ये देखील त्यांनी अजून मुबलक लेखन केले आहेत. यापूर्वी विनोबा ,कृष्णमूर्ती, संत ज्ञानेश्वर, गिजूभाई बधेका यांच्या संदर्भातील शिक्षण विचारावर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
.सातत्याने महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रकाशित करण्यात येत आहे. राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा सहभाग राहिला आहे.राज्य अभ्यासक्रम निर्मिती तसेच मूल्यमापन ,शासनाच्या इतर प्रशिक्षण साहित्य निर्मिती व प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे.