विवाह समारंभ सेवा आणि सामाजिक योगदानाचा अनुकरणीय आदर्श

पुणे, २३ डिसेंबर ( प्रतिनिधी )
येथील श्री-विष्णूकृपा सभागृहात चि.निहार (सौ.राधिका व रविंद्र शिंगणापुरकर यांचे सुपुत्र) आणि चि.सौ.का.श्रुती (सौ. निशा व श्री.विनायक शिधये यांची कन्या) यांचा विवाह मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेत पार पडला.या मंगल प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय डॉ मोहनजी भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.
या विवाह समारंभात विविध मान्यवर उपस्थित होते.त्यांनी नवदांपत्याला आशीर्वाद दिले.या मंगल प्रसंगी विवाहाच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत मंगल निधी म्हणून चार सेवाभावी संस्थांना प्रत्येकी रुपये ५१,००० चे ( प्रत्येकी एक्कावन हजार रुपये ) योगदान दिले. या संस्थांमध्ये सेवा आरोग्य फाउंडेशन,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,स्वानंद जनकल्याण आणि भारतीय संस्कृती संवर्धक संस्था यांचा समावेश होता.
सेवा आरोग्य फाऊंडेशन ही सेवा भावी संस्था असून संभाजी भागातील एकूण ४२ वस्त्यांमध्ये ७८ विविध उपक्रमांद्वारे सेवा कार्य करीत आहे.
दोन्ही कुटुंबियांचे हे योगदान सामाजिक सेवेसाठी एक आदर्श व प्रेरणादायी ठरले आहे.निहार आणि श्रुती यांच्या मंगलमय वैवाहिक जीवनासाठी सर्व उपस्थितांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याची माहिती.सेवा आरोग्य फाऊंडेशन पुणे संचालक मनोज देशमुख यांनी दिली