श्रावस्ती विहार सांगली .येथे बौद्ध धम्म संस्कार संघ

श्रावस्ती विहार सांगली .येथे दिनांक १२/०१/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता साप्ताहिक वंदनेस उपस्थित असलेल्या सर्व माता बंधू भगिनी उपासक उपासीका यांचे प्रास्ताविक व स्वागत श्रावस्ती विहाराचे सह खजिनदार जगन्नाथ आठवले यांनी केले, सर्वप्रथम आपले आदर्श महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न सिम्बॉल ऑफ नॉलेज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प दीप यांनी पूजन केले राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती साजरी करून अभिवादन केले. त्यानंतर श्रावस्ती विहाराचे संचालक सी .बी. चौधरी यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून पंचशील ही बौद्ध धम्मातील नियमावली आहे, सामान्यतः पाच तत्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम/ गुण आहेत. भगवान बुद्धांनी सामान्य माणसाच्या करिता /उपासका करिता आपल्या शरीरावर, मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी त्यापासून परावृत होण्यासाठी हे पाच गुण सांगितले आहेत. पाच शिलाची शिकवण तथागत भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती. सामान्यतः जगातील सर्व बौद्ध ही पाच शिले पाळतात .
शील ग्रहण करण्याच्या दोन पद्धती आहेत. ज्या ठिकाणी बौद्ध भिक्खू असेल तर त्यांच्या समोर आसनस्थ होऊन बौद्ध उपासक उपासिका यांनी हात जोडून त्रिसरण आणि पंचशील देणे बाबत विनंती) याचना केली जाते. आणि त्यांच्याकडून याचना करून शील ग्रहण केल जाते. परंतु दुसरी पद्धत भिक्खू जर उपलब्ध नसेल तर बौद्ध उपासक उपासिका यांनी पंचशील पठण केले जाते.
पंचशील हे पाली भाषेतील उच्चारासह व अर्थासह व्यवस्थित मांडणीपूर्वक सांगितले.
नमो/नमस्कार/ वंदन, तस्स/ त्याला, भगवतो/भगवंत -ज्याने स्वतःमधील शत्रुत्वाच्या भावनेचा नाश केलेला आहे /शत्रुत्वाच्या भावनेवर विजय प्राप्त केलेला आहे. सम्मा/ सम्येक सम्बुध्दस/सम्बुध्दाला ज्याने कोणत्याही मदतीशिवाय निर्वाण, मुक्ती प्राप्त करून, सर्व मानव जातीला सदर मुक्तीचा मार्ग (विपश्यना) शील, समाधी, प्रज्ञेचा मार्ग दाखवण्यास सक्षम /समर्थ आहे.
पंचशील
१. पाणाति पाता / पाण+अतिपात पाण म्हणजे प्राणी /जीव, अतिपात म्हणजे हिंसा मारून टाकणे, वेरमणी अलिप्त राहणे, विरक्त राहणे दूर राहणे, सिक्खा पदं म्हणजे प्रतिज्ञा, शिकवण. समादियामी म्हणजे ग्रहण करणे/ वागणे/ आचरण करणे
मी जीव हिंसेपासून प्राणी हत्ते पासून अलिप्त /,विरक्त राहण्याची शिक्षा शिकवण/ प्रतिज्ञा ग्रहण करतो. अशा प्रकारे पालीतील पाच प्रतिज्ञांचा अर्थ व्याकरणा सहित समजावून सांगितला.
त्यानंतर माघ पौर्णिमे बाबत थोडक्यात माहिती सांगितली आणि सर्व उपस्थितांनी शांतपणे ऐकून व समजून घेतले त्याबद्दल आभार मानले.
यावेळी उपस्थित आयुष्यमती सुजाता चंदनशिवे, विहाराच्या संचालिका,शैलजा साबळे यांनी मां जिजाऊ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमानां पुष्पहार घालून समुदाईक वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
आयु. सी. बी. चौधरी यांनी धम्म देसाना दिली सुजाता चंदनशिवे यांनी सर्व समाज बांधवानी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन केले. जगन्नाथ आकाराम. आठवले यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले धम्म पालन गाथा होऊन कार्यक्रमांची सांगता झाली तसेच अंकली येते तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेस सर्व उपासक उपासिका यांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घेणेबाबत विनंती केली.