सर्वोदय विद्या मंदिर राजुर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

अकोले प्रतिनीधी
गुरुवर्य रा .वि .पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्त अनेक विद्यार्थ्यांचे आपली मनोगते व विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे कोषाध्यक्ष मा विवेक मदन साहेब तसेच संस्थेचे संचालक श्री येलमामे एस.टी. व श्री पवार व्ही.डी.उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री ताजणे बी.एन. होते. याप्रसंगी मदन साहेब यांनी शिवजयंतीचे महत्व व शिवाजी महाराजांचे कार्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे त्यांनी भरभरून कौतूक केले तसेच विद्यार्थीनी कु पलक महाले व दीक्षा मुठे यांनी शिवाजी महाराज यांच्या विषयी सुंदर अशी भाषणे केली त्याबद्दल संस्थेचे संचालक श्री.पवार व्ही.डी. यांनी प्रत्येकी रुपये 500 बक्षिस देवून मुलींचे कौतूक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री ताजणे बी.एन. यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला . या कार्यक्रमाचे प्रमुख कला शिक्षक श्री पांडे सर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ व मावळे यांच्या वेशभुषा केल्या होत्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घाणे एस व्ही यांनी अतिशय सुंदर केले व शेवटी कार्यक्रम संयोजक श्री दिंडे एम.एस.यांनी सर्वांचे आभार मानले .