गुरु आराध्या फाउंडेशन नाशिक चे राज्यस्तरीय “महाराष्ट्र कोहिनूर रत्न” पुरस्कार जाहीर

नाशिक प्रतिनिधी/ डॉ शाम जाधाव
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गुरु आराध्या फाउंडेशन नाशिक चे वतीने दिला जाणारे राज्यस्तरीय महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार २३ फेब्रुवारी रोजी नाईस संकुल, आयटीआय सिग्नल जवळ त्रंबक रोड नाशिक येथे दुपारी ३ वाजता या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे गुरु आराध्या फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ भागवताचार्य ह भ प अर्चनाताई आहेर – गणोरेकर यांनी दिली
महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी गुरु आराध्या फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय कोहिनूर रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते त्याचाच एक भाग म्हणून गुरु आराध्या फाउंडेशन च्या
द्वितीय वर्धापन दिनाच्या औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांचा कोहिनूर रत्न राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
राज्यस्तरीय कोहिनूर रत्न पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे डॉ. मनोहर चव्हाण माजी सैनिक अकोला (देशसेवा) नितीन पांडुरंग कुंभार मुंबई ( मूर्तीकार ), भागवताचार्य सिमाताई राजेंद्र काळे चांदवड ( महिला किर्तनकार), सौ. मनिषा ज्ञानेश्वरी कंठस्थ हभप ऋषिकेश महाराज चव्हाण, निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे, स्वानंद नादब्रम्ह च्या सौ गायत्री सोनार, यांचा समावेश योगेश पगार कळवण पद्धतीने शेती (आदर्श कृषी), डॉ. सुभाष केशव सोमण कोतूळ ता अकोले. (धन्वंतरीतील देवमाणूस), डॉ. अँड विलास खैरनार, चास (कृषी), शाम दिलीप पाटील देवळा
(शैक्षणिक), हभप ऋषिकेश महाराज चव्हाण (ज्ञानेश्वरी कंठस्थ) ठाणगाव येवला, परशुराम अहिरे बागलाण (समाज सेवा), सौ. शारदा बाळकृष्ण गायकर ब्राम्हणवाडा (राजकीय), सौ. साधना योगेश पगार कळवण (आदर्श कृषी), डॉ. चेतनाताई सेवक राधिका फाउंडेशन (सामाजिक), प्रा. प्रविण
यादवराव देवरे सटाणा (आदर्श प्राध्यापक), अरविंद वसंत आहेर गणोरे, अकोले (आदर्श शिक्षक) सौ. गायत्री अरविंद सोनवणे बागलाण ( कर्तबगार स्त्री), सौ. मायाताई गोकूळ गुंजाळ श्रीरामपुर (आरोग्यक्षेत्र), प्रा दिपीका चव्हाण, मुंबई
(आदर्श प्राध्यापिका), सचिन दत्तात्रय बिरारी चोपडा (सामाजिक कार्यकर्ते), पत्रकार रामभाऊ आवारे सर वनसगाव निफाड (पत्रकारिता व वारकरी स्टार प्रचारक), सौ. दिपीका शरद अहिरे, केरसाने, सटाणा (आरोग्य क्षेत्र) सौ.शिल्पा झारेकर नाशिक (सामाजिक), दिपक रामनाथ खुळे, कोल्हेवाडी संगमनेर (वृक्षप्रेमी), केशवराव यशवंतराव जाधव
टाकळी विंचूर (सामाजिक), डॉ. काकाजी दगा पवार भऊर (पत्रकारिता), संजय देशमुख संस्थापक – साईधन वर्षा फाउंडेशन नाशिक (सामाजिक), अमोल गंगाधर गुंजाळ महाराष्ट्र पोलीस सिन्नर, डॉ ज्योती केदारे शिंदे नाशिक
(महिला प्रेरणादायी व्यक्तीमत्व), आनंदा दत्तात्रय
राजगुरू वावी ठुशी (आदर्श मुख्याध्यापक), डॉ शाम हरी जाधव नाशिक (पत्रकारिता), सौ गायत्री ताई बापूसाहेब सोनार मनमाड (अध्यात्मिक), रचना चिंतावार नाशिक (सांस्कृतिक क्षेत्र) डॉ अण्णासाहेब कदम मा सरपंच विखरणी येवला
(अध्यात्मिक), सौ. रिंकू पाटील नाशिक ( सामाजिक क्षेत्र) कार्तिका विश्वास शेवाळे पिंगळवाडे (आदर्श कृषी कन्या), ह.भ.प दिनेश वाडीकर रायगड (किर्तनकार) अध्यात्मिक क्षेत्र,
दिमी सुभाष मोरे (डिझाईनिंग क्षेत्र), सौ. प्राची राव (शैक्षणिक) अशा विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.