जंगलांचा वनवा थांबविण्याचे आदिवासी तरुणींचीचे हे गाणे होतेय व्हायरल!

संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
जंगल संपत्तीचे रक्षण करण्यासाठी दोन आदिवासी मुलींचे गाणे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असुन या गाण्यातुन या मुलींनी निसर्गाचा समतोल राखत निसर्ग वाचविण्याचे आव्हान केले आहे .
अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीची पर्वतरांग असून या पर्वतरांगेमध्ये आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे . निसर्ग म्हणजे आदिवासी बांधवांची देवता . या देवतेवर आत्ताच्या काळातील मनुष्य घाव घालताना दिसून येत असून निसर्ग थोडक्यात वनसंपदा नष्ट करण्याच्या मागे लागला आहे. हा निसर्ग वाचला तरच निसर्गाचा समतोल राखला जाणार आहे .
आज-काल मनुष्य हा फक्त झाडे तोडण्यात व्यस्त दिसत असुन त्याची पुन्हा लागवड करण्यास धजावत नाही . तसेच वृक्षारोपणाना विषयी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनाही कुचकामी ठरत असुन वृक्षरोपण फक्त कागदावरच दिसुन येते आहे.
त्यातच आता उन्हाळ्याची चाहुल लागल्यात जमा झाली असुन सर्वत्र ऊन्हाचा भडका जानवण्यास सुरुवात झाली आहे.
या कालावधीत जंगलांना मानवनिर्मित वणवा जाणिवपुर्वक लावला जातो .हा वणवा थांबविण्यासाठी अकोलेच्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात असणाऱ्या घाटघर या गावातील आरती गांगड ( खडके ) व दिपाली गांगड या दोन बहीणींनी ‘ हे जंगल सारं आपलंच हाय रं , वणराईला वणवा लावायचा नाय रं ‘ या गाण्यातुन संपुर्ण मानव जातीला जंगलाला आग न लावण्याचे आवाहन केले आहे. या गितामध्ये जंगलापासुन मिळणा-या थंडगार सावली पासुन तर मुक्या प्राण्यांची शिकार न करण्याचा आग्रह या दोन भगिनी करत आहेत. या गितामधुन पर्यावरणाचा समतोल राखला तरच निसर्ग वाचु शकतो असे सांगितले गेले आहे. विशेष म्हणजे हे गित सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असुन या गिताला आदिवासी भागात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गिताची रचना कवि पांडुरंग खडके यांनी केली असुन हार्मोनियमची साथ एकनाथ गांगड यांनी दिली आहे.